India Languages, asked by NikunjSatpute, 1 month ago

वर्तमानपत्रे बंद झाली तर​

Answers

Answered by dapushree
6

Answer:

बहुतेकजण ही परीक्षणे वाचून चित्रपट - नाटक पाहायचे की नाही, हे ठरवतात. या पुरवण्यांत साहित्याशी संबंधित अशी सदरे असतात. त्यावरून कोणते पुस्तक वाचायचे, कोणता ग्रंथ खरेदी करायचा यांबद्दल निर्णय घेता येतो. वर्तमानपत्र आपल्याला रोजचे पंचांग म्हणजे कोणती तिथी, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त यांबद्दल ज्याप्रमाणे माहिती देते, त्याप्रमाणे आपल्या राशींचे भविष्यही आपल्याला सांगते. सोन्याचांदीचे भाव, लॉटरीचे निकाल, पौंड - डॉलर यांच्या रुपयातील किमती यांबाबतच्या बातम्या वृत्तपत्र घरबसल्या देतात. वृत्तपत्रे बंद झाली तर मग अनेकांची गैरसोय होईल. समाजात नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून वादळ उठत असते. मग लोकशाही राज्यात लोकांना आपली मते मांडायची असतात. वृत्तपत्र त्यांना उत्तम व्यासपीठ देते. जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारत पराभूत झाला, तेव्हा भारतीयांच्या भावना भडकून उठल्या. मग वृत्तपत्रांतून पानेच्या पाने भरून जनमानस व्यक्त होऊ लागले.

'जनमनाचा कानोसा', लोकमानस', 'वाचकांची पत्रे' ही वृत्तपत्रांतील सदरे नेहमी अगदी जिवंत आणि झणझणीत असतात. अलीकडे वृत्तपत्रांतून विदयार्थ्यांचा अभ्यासही घेतला जातो. पुढील जीवनात कोणती शाखा निवडावी, कोणता अभ्यास करावा, यांबाबतही वृत्तपत्रे मार्गदर्शन करू लागली आहेत. अशी ही वर्तमानपत्रे समाजजीवनात चैतन्य निर्माण करतात. यशस्वी समाजाच्या नाड्या त्यांच्या हातात असतात. मग ती बंद पडून कसे चालणार?

Answered by ItzMissPayal
4

वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्याला काही समजणार नाही . कारण वर्तमान पत्रामध्ये बातम्या असतात संपुर्ण जगात काय चाललंय हे समजत आपणास त्यामुळे वर्तमान पत्र असायला पाहिजे.

Hope it's helpful dear mark mi brilliant

Answer By :-) ItzPayal.☺️

Similar questions