वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. (सकारण स्पष्ट करा)
Answers
Answer: वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. कारण-
१. एखाद्या घटनेचा सखोल आढावा घेताना वृत्तपत्रांना त्या घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो.
२. वर्तमानपत्रातील काही सदरे ही फक्त इतिहासावर आधारित असतात. त्यातून भूतकाळातील आर्थिक, राजकीय व सामाजिक घडामोडी समजतात.
३. एखाद्या घटनेची किंवा व्यक्तीची शताब्दी अथवा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वृत्तपत्रे विशेष पुरवण्या काढतात. अशावेळी त्या घटनेचा किंवा व्यक्तीचा इतिहास अभ्यासणे आवश्यक असतो.
४. दिनविशेष सारख्या गोष्टींची माहिती इतिहासाद्वारेच मिळते. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो.
Explanation:
Answer:
वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते
१.वर्तमानपत्रांना रोजच्या रोज बातम्या छापत असताना बातमी मागील बातमी सांगणे आवश्यक असते
२. तसेच,घडलेल्या घटनांचा संबंध ऐतिहासिक घटनांची लावून सविस्तर ती मांडावी लागते
३.सदरे छापत असताना भूतकाळातील घटनांची माहिती आवश्यक असते
४. एखाद्या विशिष्ट प्रसंगी जसे की एखाद्या घटनेला विशिष्ट वर्ष पूर्ण झाले असता त्याचे विशेष अंक अग्रलेख इत्यादी सविस्तर मांडावे लागते