History, asked by falgunitandulkar3, 18 days ago

वर्तमानपत्रातील येणाऱ्या बातम्याची
विश्वासार्हता कशीलवासावी लागते?

Answers

Answered by sadhanashinde83990
7

Explanation:

बातमी मिळवण्यासाठीचे सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम म्हणजे वर्तमानपत्रेच आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मीडिया कन्सल्टिंग फर्म ऑरमॅक्स मीडियाने यासंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले हाेते. त्यात ही बाब समाेर आली. इतर पारंपरिक आणि डिजिटल मीडिया प्लॅटफाॅर्मच्या तुलनेत बातम्या मिळवण्यासाठीचे सर्वांत विश्वासार्ह माध्यम म्हणजे वर्तमानपत्रच आहे, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. वर्तमानपत्रे ही आपली विश्वासार्हता वेगाने गमावत चालली आहेत आणि डिजिटल न्यूज त्यांची जागा घेतील, असा समजदेखील या सर्वेक्षणाने दूर केला आहे.विश्वासार्हतेच्या सूचीमध्ये (न्यूज क्रेडिबिलिटी इंडेक्स) वर्तमानपत्रांनी 62% पहिले स्थान पटकावले आहे, तर त्यापाठाेपाठ रेडिओ आणि टीव्हीला पसंती मिळाली आहे. सध्या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर मिळणाऱ्या सत्य आणि कल्पित गाेष्टींमध्ये फरक करणे दिवसेंदिवस कठीण हाेत चालले आहे. तसेच, फेक न्यूजमुळे धाेका वाढत चालला असल्याच्या काळातच या सर्वेक्षणातील निष्कर्ष समाेर आले आहेत. ऑरमॅक्स मीडियाचा हा न्यूज क्रेडिबिलिटी इंडेक्स नावाचा सर्व्हे 17 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये घेतला गेला. त्यात 15 वर्षांवरील 2,400 नागरिक सहभागी झाले हाेते.डिजिटल आणि साेशल मीडिया ज्या गतीने वाढत आहे त्या तुलनेत त्यांची विश्वासार्हता घसरल्याचे सर्वे क्षणात दिसले आहे. त्यात साेशल मीडियाचा वाटा 32 टक्क्यांवर व्हाॅट्सअ‍ॅपसारख्या मेसेंजर अ‍ॅपचा वाटा 29 टक्के एवढा खाली आला आहे.सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, बातम्यांसाठी डिजिटल अ‍ॅप्समध्ये ट्विटर हे साेशल मीडियावरील सर्वांत विश्वासार्ह माध्यम वाटते आहे. त्यामध्ये ट्विटर हे टीव्हीच्या जवळपास असून, ते 53 टक्के लाेकांना ते विश्वासार्ह वाटते, तर इतर लाेकप्रिय म्हणवणारी माध्यमे बरीच खाली आहेत. त्यामध्ये टेलिग्राम 31%, फेसबुक 30%, इन्स्टाग्राम 29%, तर व्हाॅटस्अ‍ॅपची क्रमवारी 28% एवढीच आहे.या अहवालानुसार सुमारे 61 टक्के लाेकांना फेक न्यूज ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे वाटते. वास्तविक टीव्हीवरील बातम्या या प्रिंट मीडियाच्याच पातळीवर असायला हव्यात. पण, तशा त्या नसणे हीच टीव्हीसाठी सर्वांत माेठी समस्या बनली आहे

Answered by chavanadityarajendra
0

Answer:

thank you for your answer

Similar questions