वर
दिलेल्या विषया निबंध लिया.
प्रामाणिकपणा
Answers
hope it helps you
.
..
...
प्रामाणिकपणा
आपल्या दररोजच्या जीवनात प्रामाणिकपणाची खरोखर गरज आहे का? एका शब्दकोशात “प्रामाणिकपणा” याची व्याख्या “दिखाऊपणा किंवा ढोंगीपणा नसणे; इमानदारी; सरळता; खरेपणा” अशी करण्यात आली आहे. स्पष्टतः, इतरांसोबत चांगले नातेसंबंध ठेवण्यासाठी हा गुण श्रेयस्कर आहे. प्रेषित पौलाने असे आर्जवले: “दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्याच्या आज्ञा पाळा, माणसांना संतोषविणाऱ्या नोकरासारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीति बाळगून पाळा.” असा कामगार कोणाला आवडणार नाही? आज, प्रामाणिक लोकांना नोकऱ्या मिळवणे आणि त्या टिकवून ठेवण्याची जास्त संधी आहे.
प्रामाणिकपणाचा देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर प्रभाव पडत असल्यामुळे तो इष्ट गुण ठरतो. प्राचीन इस्राएली लोक देवाने दिलेल्या नियमांचे आणि सणावारांचे पालन करत असत तेव्हा त्यांना देवाचा आशीर्वाद मिळत होता. मंडळीतील शुद्धतेची चर्चा करताना पौलाने ख्रिश्चनांना उत्तेजन दिले: “आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा.” आपली उपासना देवाला स्वीकारयोग्य असावयास हवी आहे तर प्रामाणिकपणा केवळ इष्ट नव्हे तर आवश्यक गुण आहे. परंतु, लक्षात घ्या की, केवळ प्रामाणिक असणे पुरेसे नाही. त्याला खरेपणाचीही जोड हवी.
टायटॅनिक जहाजाचे बांधकाम केलेल्यांना आणि त्यातील प्रवाशांना मनापासून असे वाटले असावे की, ते कधीही बुडणार नाही. पण १९१२ साली पहिल्याच प्रवासात ते एका हिमनगाला धडकले आणि या दुर्घटनेत १,५१७ लोकांचा जीव गेला. पहिल्या शतकातील काही यहुद्यांनाही प्रामाणिकपणे असे वाटले असावे की, देवाची उपासना करण्याची त्यांची पद्धत योग्य होती, पण त्यांचा आवेश “यथार्थ ज्ञानाला अनुसरून” नव्हता आपल्याला देवाला स्वीकारयोग्य व्हायचे असल्यास, आपले प्रामाणिक विश्वास अचूक ज्ञानावर आधारित असले पाहिजेत. प्रामाणिकपणे व खरेपणाने देवाची सेवा करणे म्हणजे नेमके काय आहे याचे परीक्षण करण्यासाठी तुमच्या समाजातील यहोवाचे साक्षीदार आनंदाने तुमची मदत करतील.