वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात
वर्णन करा-
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
मुझे जवाब नहीं पता...
Explanation:
माफ़ करना...
Answered by
1
वरंधा घाटातील निसर्गाचे वर्णन:
आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना निसर्गरम्य वातावरण लाभलं आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे तेथील वातावरण देखील खूप सुंदर बनलं आहे. हिरवीगार झाडे, उंचच्या उंच डोंगरमाळा, उंचावरून पडणारे धबधबे तसचं, त्या हिरव्यागार परिसरात आढळणारे निरनिराळे प्राणी, पक्षी, फळे, फुले यामुळे तेथे जणू काही स्वर्गच अवतरल्या सारख वाटते.
- पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर असणारा २० किमी लांबीचा डोंगराळ घाट मार्ग म्हणजे “वरंधा घाट” होय. पुण्यावरून भोरमार्गे महाडला जातांना हा घाट लागतो.
- पश्चिम घाट पर्वतरांगांच्या सीमेवर वसलेल्या या वरंधा घाटात अनेक प्रकारची रमणीय धबधबे, तलाव आणि घनदाट जंगल असून त्यात विविध प्रकारची जंगली प्राणी आपणास पाहायला पहायला मिळतात.
- पर्यटक प्रेमीना भ्रमंती करण्यास आल्हाददायक आनंद देणारा हा घाट असून दरवर्षी हजारो लोक या ठिकाणी भ्रमंती करण्यासाठी येतात. सहयाद्री पर्वताच्या मध्यभागी स्थित असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभागून हा घाट कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगर कुशीत गर्द झाडांच्या मध्यभागी समर्थ रामदासस्वामी यांची शिवथरघळ आहे.
- वरंध हा घाट पुण्यापासून सामारे ११० किमी दूर असून महाडपासून सुमारे २५ किमी दुरिवर आहे. या घाटाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या घाट रस्त्यावर असलेलं वाघजाई माता मंदिर, या मंदिराजवळून आपणास डोंगर माध्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांची तसचं, खोलवर दऱ्या खोऱ्यांची सुंदर प्रलोभनीय दृश्ये आपल्या दृष्टीस पडतात.
- वाघजाईच्या समोर एक उंच डोंगर असून तो डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. पावसाळ्यात त्या डोंगराच्या चहुबाजूने धबधबे कोसळतात. या घाटातील दोन्ही अंगाचे डोंगर म्हणजे कावळ्या उर्फ मनमोहन गड किल्ला.
- तसचं, या गडाच्या वाघजाई कडील डोंगर गडामध्ये नऊ खोदीव टाकी असून दुसऱ्या बाजूने देखील अश्याच स्वरुपाची काही टाकी आणि शिबंदीच्या घराचे अवशेष दिसून येतात.
Similar questions