India Languages, asked by mrvikumar, 1 year ago

varsha hrutu essay in marathi

Answers

Answered by Dimpullilly
0
माझा आवडता ऋतू 

              आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. सर्व ऋतुंमध्ये वर्षाऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो 
        पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो. डोक्यावर रणरणणारे ऊन,पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मनोवर, अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी नकोसा झालेला असतो; उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात. सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसासे टाकत असते. सर्व पशुपक्षी थंडगार सावलीचा निवारा शोधात असतात आणि त्याच वेळी पाऊस येतो धो धो कोसळत. वातावरणातील उकाड्याचा ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमात गारवा  शिरतो. चारचर   सृष्टी तृप्त  होते. असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार अन्ही ?
         जून मध्ये शाळा सुरु होते. त्याच्या आसपास पावसाळा सुरु होतो. नवे वर्ष, नवे वर्ग, नवा गणवेश नवी पुस्तके आणि नाकी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. त्याच वेळी चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. त्याच्या सोबत नाचत-बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगाच्या छत्र्या, तर्हेतर्हेचे रेनकोट यांमुळे शाळेकडे जाणारी वाट रंगानी फुलून जाते. जणू ती वाटच आपल्यासोबत उत्साहाने शाळेत येत आहे !
         हा पाऊस मोठा आदिगर आहे. तो रुक्ष, रखरखीत शृष्टीचे रूपाच पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमलीसारखी हिरवळ पसरते. वृक्षवेलीहिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटतात. शेत हिरव्यागार रोपणी डोलू लागतात. खळखळणारे ओढे-नाले सगळीकडून वाहत असतात. सर्वशृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते.
         या पावसाची रूपे तरी किती ? काढितो थुई थुई नाचत येतो; कधी रिमझिम येतो, कधी तो धो धो कोसळतो; तर कधी प्रचंड गडगडाट करत विजांचा  चकचकाकाट करत धुवाधार बरसतो 
         एखाद्या दिवशी प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात भरदिवसा जणू रात्रच सुरु होते. पाऊस पडून गेला की, धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. उघडीप येते तेव्हा सर्वत्र हिरवागार गालीचा पसरल्यासारखे वाटते.पाहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते क्वचित सूर्याला पावसाची मौज लुटायची लहर येते. मग ढगांना बाजूला सारून तो नाभगणात उतरतो. त्याची सोनेरी किरण पावसात चमचमू लागतात. आणि की आश्चर्य आकाशात ते मनोहारी इंद्रधनुष्य तरळू लागते. आणि बाल्काविच्या ओळी मनात अलगद उतरतात-

                                             वरती बघता इंद्रधनुष्याचा गोफ दुहेरी विणलासे;
                                             मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

         असा हा सुखदाता पावसाळा सर्व सृष्टीचा पोशिंदाहि आहे. तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरती मातेला सुफला बनवतो. चार महिन्यांत हा पाऊस वर्षभराचा पाण्याची, धण्याची बेगमी करतो की, वर्षाऋतू म्हणजे पावसाळा हाच सर्व ऋतूचा राजा.    
Answered by VarshaS553
0

Answer:

वर्षा ऋतु हमारे देश में जुलाई माह से प्रारंभ होती है और सितंबर माह तक वर्षा होती है. गर्मियों की झुलसा देने वाली गर्मी के बाद सभी लोग बेसब्री से बारिश का इंतजार करते है. हमारे देश के किसान तो हर समय आसमान की तरफ टकटकी लगाए देखते रहते है.

वर्षा ऋतु किसानों के लिए किसी वरदान से कम नहीं है इस समय किसानों खरीफ की फसल बोते है और बारिश आते है फसल लहरा होते है चारों ओर खेतों में हरी भरी फसल लहराते देखकर मन प्रशंसा पूर्वक हर्षा उठता है

गर्मी के कारण सूखे हुए पेड़ पौधे भी नव अंकुरित हो उठते है, सूखी हुई नदियां, तालाब, बावड़िया, बांध पानी से लबालब भर जाते है धरती की प्यास बुझती है और भूजल स्तर ऊंचा उठ जाता है. सभी जीवो को बारिश से राहत की सांस मिलती है.

बारिश के आगमन पर मोर छम-छम करके नाचता है, कोयल मीठी राग सुनाती है, मेंढक टर्र-टर्र करके अपनी खुशी जाहिर करता है. वर्षा ऋतु बहुत ही मनोरम ऋतु होती है इस ऋतु में सभी का मन ऐसा होता है क्योंकि चारों तरफ हरियाली, ठंडी हवा और सुख शांति फैल जाती है.

मानसून के दिनों में आसमान में काले सफेद बादल पानी लेने के लिए दौड़ते नजर आते है, काली घटाओं में बिजली का चमकना बहुत अच्छा लगता है.

गर्मियों के कारण जो बच्चे घर से बाहर निकलना बंद कर देते हैं बारिश के मौसम में वे बाहर निकल कर खूब खेलते नाचते गाते है और बारिश का भरपूर आनंद उठाते है.

बारिश का मौसम पृथ्वी पर रहने वाले प्रत्येक जीव को नया जीवन प्रदान करता है इसलिए मुझे वर्षा ऋतु बहुत पसंद है.

Similar questions