vartaman patr nibandh in vaicharik in marathi
Answers
Answer:
रोज सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र सर्वात आधी वाचण्यावरून माझी आणि ताईची नेहमीच भांडणे होतात. आज सकाळी हीच भांडणे ऐकून आई रागानेच उद्गारली. “घरात शांतता राहील का?, सकाळची ही वर्तमानपत्रे कायमची बंद झाली तर बरेच होईल !
आईने म्हटल्याप्रमाणे, वर्तमानपत्रे खरेच बंद पडली तर? तर काय होईल? बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र सुरू केले, त्याचे अगदी रास्त नाव ठेवले होते दर्पण 'दपर्ण' म्हणजे 'आरसा'. वर्तमानपत्र हा समाजजीवनाचा आरसा असतो. समाजात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शासकीय अशा विविध पातळीवर जे जे घडते, त्याचे पडसाद वर्तमानपत्रात उमटतात. वर्तमानपत्रे नसती तर हे कसे शक्य झाले असते?
वर्तमानपत्रे बंद पडली, तर सामान्य माणसाची सगळी सकाळच निरसवाणी जाईल. कारण सकाळी गरम गरम चहाच्या घोटासोबत वर्तमानपत्रातील विविध सदरातील बातम्या वाचण्याची मौज काही वेगळीच असते. वर्तमानपत्राच्या अभावी वाचकांना देशविदेशातील चांगल्या-वाईट घटना, घडामोडी कशा कळतील? सरकारी योजना लोकांपर्यंत कशा पोहचतील? एकाच घटना प्रसंगावर आपल्या विविध समाजबांधवांचे वेगवेगळे विचार वर्तमानपत्रातून समजून घेता येतात.
थोडक्यात, वर्तमानपत्र हे करमणुकीबरोबर लोकशिक्षणाचेही माध्यम आहे. या वर्तमानपत्रांमुळे जग लहान झाले आहे. अशी ही मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारी वर्तमानपत्रे बंद झाली तर शिक्षणाचे एक मोठे साधनच नाहीसे होईल व समाजाची प्रगतीच खुंटेल.
Explanation:
mark me as brain list