vartaman Patra band Jala kar
Answers
■■ वर्तमानपत्र बंद झाले तर!!■■
आजसुद्धा आपल्यामधील बऱ्याच लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि वर्तमानपत्रासोबत होते. अशा वेळी, वर्तमानपत्र बंद झाले तर, लोकांची फार गैरसोय होईल.
वर्तमानपत्रातून आपल्याला देशात तसेच जगात चालू असलेल्या सामाजिक व राजकीय घडामोडी कळतात.वर्तमानपत्र नसल्यावर लोकांना टीव्ही,रेडियो किंवा मोबाइलवर बातम्या पाहायला व ऐकायला लागतील.
वर्तमानपत्रात लाहनमुलांसाठी गमतीदार गोष्टी,चित्र रंगवण्यासाठी कोरे चित्र असतात.गृहीणींसाठी उत्तम खायच्या रेसिपी,सौंदर्य प्रसाधनांबद्दल माहिती असते.तरुणांसाठी चित्रपटसृष्टीतील बातम्या व इतर मनोरंजनाच्या गोष्टी असतात. वर्तमानपत्र बंद झाले तर, ही सगळी माहिती आणि आपले मनोरंजन कुठून होणार?
वर्तमानपत्रामुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल ज्ञान मिळते.टीव्ही,रेडियो,मोबाइलच्या माध्यमातून आपण बातम्या तर पाहू व ऐकू शकतो,परंतु या गोष्टींचा अतिवापर केल्यास डोळ्यांना हानि होऊ शकते,तसेच प्रत्येकाकडे या गोष्टी घेण्यासाठी इतके पैसे नसतात.
तेव्हा एकाच जागी वेगवेगळे क्षेत्र आणि गोष्टींबद्दल माहिती देणारे स्वस्त स्त्रोत हे वर्तमानपत्रच आहे.म्हणून ,वर्तमानपत्र बंद झाले तर, हा विचार सुद्धा आपण नाही केला पाहिजे.