वस्तू कविता भावार्थ
Answers
I think it's helping you
प्रस्तावना:
द. भा. धामणस्कर यांच्या कवितेची वैशिष्ट्ये म्हणजेसामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्तकरताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणिअभिव्यक्तीतील संयम.
ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कवीच्यामते आपण अनेक निर्जीव वस्तू दैनंदिन जीवनातवापरत असतो. या वस्तू अनेक दिवस वापरल्यानेमाणसाचा त्या वस्तूंशी एक स्नेहभाव तयार होतो,त्यांच्यात एक अतूट नाते तयार होते. याच कारणामुळेथोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयातजतन केल्या जातात. कवींच्या मते निर्जीव वस्तूंनाहीभावना असतात. त्यामुळे माणसाने वस्तूंना मनअसल्यासारखे वागावे.
वस्तू आपल्या सेवेसाठी असल्या तरी त्यांना आपणयोग्य तो मान दिला पाहिजे. वस्तूंना आपण स्वच्छठेवले पाहिजे, म्हणजे वस्तूंनाही आनंद होतो. प्रत्यक्षआनंद होत नसला तरी स्वच्छतेने वस्तूचे आयुष्यवाढते. व घरातील वातावरणही प्रसन्न राहते. आयुष्यसंपल्यानंतर याच वस्तूंमुळे माणसाच्या आठवणीजिवंत राहतात.