) वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या या काव्यपंक्तीतील अर्थ स्पष्ट करा.
वस्तु निखालस सेवकच असतात आपल्या या काव्यपंक्तितिल अर्थ स्पष्ट करा
Answers
Answer:
वस्तू निखलस सेवकच असतात
Answer:
कवी द. भा. धामणस्कर यांच्या वस्तू या कवितेतील या ओळी आहेत.
त्यांनी निर्जीव वस्तू चे वर्णन या कवितेत केलेले आहे. वस्तू या कवितेत कवींनी निर्जीव वस्तूंना महत्त्व प्राप्त करून दिलेले आहे.
वस्तू आपण प्रेमाने जपाव्यात त्यांची काळजी घ्यावी कारण वस्तू या आपल्या गरजा पूर्ण करत असतात. आपल्या उपयोगी येऊन त्या आपली मदत करत असतात. वस्तूंची काळजी घेऊन आपण त्यांना योग्य तो मान दिला पाहिजे.
वस्तूंना आपण निरुपयोगी न समजता त्या आपल्यासाठी किती उपयोगी आहेत ही भावना लक्षात घेतली पाहिजे. वस्तूंचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. त्यांना नोकरा सारखी वागणूक देणे योग्य नाही. म्हणून कवी सांगतात वस्तूंना पण मान दिला पाहिजे, त्यांची अवहेलना करू नये. योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी वस्तू आपल्याला कामी पडत असतात हे जाणून घ्यायला हवे.