India Languages, asked by ShUbH6087, 8 months ago

वसंत साग के बारे में जानकारी मराठी में

Answers

Answered by anamkhurshid29
2

हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसन्ताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसन्ताचे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसन्त ऋतू येणारे हिन्दू महिने वेगळेवेगळे आहेत.

मात्र, वसन्त पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसन्तोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते.

इंग्रजीमध्ये वसन्त ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात. युरोपात मार्च-एप्रिल हे महिने वसन्त ऋतूचे असतात, तर ऑस्ट्रेलियातील वसन्त ऋतू हा सप्टेंबर ऑक्टोबर-नोव्हेम्बर महिन्यांत येतो.

अवान्तर संपादन करा

वसन्त हे वासुदेव बळवन्त पटवर्धन या मराठी कवीने घेतलेले टोपणनाव आहे. 'वसन्त' हे दत्तप्रसन्न काटदरे यांनी चालवलेले मराठीतील एक दर्जेदार मासिक होते.

वसन्त पंचमी (माघ शुद्ध पंचमी) संपादन करा

वसन्ताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो ह्या दिवसापासून सुरू होतो. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसन्त ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌ कुसुमाकरः' असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे. कवीश्वर जयदेव तर वसन्त ऋतूचे वर्णन करताना थकलाच नाही.

सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौन्दर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे.

मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्ग एक अशी अजब जादू आहे की, तो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तात्काळ पुरेसे विस्मरण करवितो. जर ह्या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो.

निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो.

Hope this helps ❤️❤️

Please mark as brainliest ❤️

Similar questions