वस्तू उत्पादन करण्याची पद्धती स्पष्ट करा
Answers
Answer:
☰
Do
शोध पोर्टल
शिक्षण
विद्यार्थ्यासाठी दालन
अर्थशास्त्र
उत्पादन
अवस्था:
उघडा
उत्पादन
मानवी गरजा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पूर्ण करण्याची शक्ती असलेल्या वस्तूंची वा सेवांची निर्मिती. विज्ञानातील पदार्थ व शक्ती यांच्या अविनाशित्वाच्या सिद्धांतानुसार या विश्वात कोणत्याही नव्या पदार्थाची अथवा शक्तीची भर टाकणे मनुष्याच्या शक्तीपलीकडचे आहे. म्हणून वस्तू उत्पादन करणे म्हणजे निसर्गाने पुरविलेल्या पदार्थांत मनुष्याच्या गरजा तृप्त करण्याचे सामर्थ्य (उपयोगिता) उत्पन्न करणे होय.
निसर्ग मनुष्याला जो कच्चा माल पुरवीत असतो, त्याचे इष्ट वस्तूत रूपांतर करण्याचे काम मनुष्याला करावयाचे असते. मनुष्य उत्पादन करतो, तेव्हा तो उपयोगितेची निर्मिती करतो. ही निर्मिती रूपजन्य, स्थलजन्य आणि कालजन्य यांपैकी कोणत्याही प्रकारची असू शकते. पदार्थांच्या अंगी मनुष्याचा गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य येण्यासाठी त्यांना विशिष्ट रूप आणि आकार प्राप्त होणे आवश्यक असते. सोनार सुवर्णकणातून दागिने निर्माण करतो व सुतार लाकूड कापून व रंधून टेबलखुर्ची बनवितो, तेव्हा सोनार व सुतार रूप-उपयोगितेची निर्मिती करीत असतात. अनेकदा पदार्थ एके ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ज्या ठिकाणी त्या पदार्थांची कमतरता असते, तेथे ते पदार्थ हलवून त्यांत स्थल-उपयोगिता निर्माण करता येते. म्हैसूरमध्ये मिळणारे चंदन मुंबईला उपलब्ध करून देण्याने चंदनाची स्थल-उपयोगिता वाढते. मनुष्याच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्याला वस्तू हव्या त्या वेळी उपलब्ध करून देणे, हेदेखील महत्त्वाचे असते. आज तयार झालेल्या वस्तूला कालांतराने उत्पन्न होणारी गरज पूर्ण करण्याचे जे सामर्थ्य लाभते, त्याला काल-उपयोगिता म्हणतात. हंगामात काढलेली पिके कोठारात ठेवून बाराही महिने विकली जातात किंवा फळे, मासे यांसारख्या नाशवंत वस्तू हवाबंद डब्यात ठेवल्या जातात, तेव्हा काल- उपयोगितेची निर्मिती होत असते उपयोगिता.
व्यवहारात उत्पादनाचा संबंध केवळ कृषी व निर्मितिउद्योग ह्यांतील मूर्त वस्तूशी लावला जातो. तसे मानल्यास वाहतूक, व्यापार, खरेदीविक्री आणि व्यक्तीगत सेवा या गोष्टी उत्पादनाच्या व्याख्येतून वगळाव्या लागतील. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तशा त्या वगळल्या जात असत. अठराव्या शतकातील प्रकृतिवादी अर्थशास्त्रज्ञांनी कृषिक्षेत्रातील वस्तूंचाच केवळ विचार केला आणि अॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो व जॉन स्ट्यूअर्ट मिल या अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादनाच्या कल्पनेत निर्मिति- उद्योगात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचाही समावेश केला. मात्र मूर्त पदार्थांची निर्मिती म्हणजेच उत्पादन, हा आग्रह त्यांनी सोडला नाही. जेव्हन्झ व कार्ल मेंगर या अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादनाची व्याख्या व्यापक केली आणि तीत मूर्त वस्तूंच्या उत्पादनाबरोबर सेवेच्या निर्मितीचा अंतर्भाव केला.
मानवी गरजांची तृप्ती करणारी कोणतीही निर्मितीची कृती उत्पादनात मोडते, असे त्यांचे प्रतिपादन होते. वस्तू उपभोक्त्यापाशी पोहोचल्याशिवाय उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, असा अर्थशास्त्रज्ञांचा आग्रह असल्याने वितरणासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक, ठोक व्यापार, किरकोळ व्यापार, साठवण या क्रिया उत्पादनात अंतर्भूत होतात. औषधांची निर्मिती म्हणजे उत्पादक श्रम व रोगाचे निदान करून औषधांची शिफारस करणाऱ्या डॉक्टरांचे श्रम हे अनुत्पादक श्रम, असा भेद करावा की नाही अशा स्वरूपाच्या तात्त्विक वादावर पडदा पडला. देशात सर्व क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या सर्व तऱ्हेच्या मूर्त वस्तू आणि शिक्षक, डॉक्टर, वकील, गवई आदी व्यावसायिकांची सेवा म्हणजे देशातील एकूण उत्पादन, हा अर्थ आता सर्वमान्य झाला आहे. उत्पादनाचे काही प्रकार सोबतच्या आकृतीत दाखविले आहेत.