वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
Answers
Answer:
SSC (English Medium) 9th Standard
Textbook Solutions
Important Solutions
Question Bank Solutions
Concept Notes & Videos
Syllabus
Advertisement Remove all ads
Short Note
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
SOLUTION
नवनिर्मितीची चाहूल देणारा हा वसंत ऋतू सर्व ऋतूंचा राजा मानला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसंताचे आगमन होते आणि सारी सृष्टीच बहरून जाते. थंडी हळूहळू कमी होत जाते. आंब्याला मोहोर येतो आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. सकाळी जाग येते ती कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी. तिचे ते गायन मनाला आनंद देऊन जाते. झाडे पोपटी, हिरव्या लुसलुशीत पानांनी सजतात, उसाची गुऱ्हाळे जागोजाग लागलेली दिसतात. थंडगार उसाचा रस प्यायला मजा येते. कलिंगडांचे ढीग बाजारात येऊ लागतात आणि द्राक्षांच्या घडांनी बाजारपेठ फुलते. याच काळात गुढीपाडवा, रामनवमीसारखे सणही येतात. मग मनही या साऱ्या बदलाने चैतन्यमय होऊन जाते. शाळेत परीक्षांचे वातावरण असते आणि बाहेर प्रसन्न वातावरण असल्यामुळे अभ्यासही छान होतो.
Answer:
नवनिर्मितीची चाहूल देणारा हा वसंत ऋतू सर्व ऋतूंचा राजा मानला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसंताचे आगमन होते आणि सारी सृष्टीच बहरून जाते. थंडी हळूहळू कमी होत जाते. आंब्याला मोहोर येतो आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. सकाळी जाग येते ती कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी. तिचे ते गायन मनाला आनंद देऊन जाते. झाडे पोपटी, हिरव्या लुसलुशीत पानांनी सजतात, उसाची गुऱ्हाळे जागोजाग लागलेली दिसतात. थंडगार उसाचा रस प्यायला मजा येते. कलिंगडांचे ढीग बाजारात येऊ लागतात आणि द्राक्षांच्या घडांनी बाजारपेठ फुलते. याच काळात गुढीपाडवा, रामनवमीसारखे सणही येतात. मग मनही या साऱ्या बदलाने चैतन्यमय होऊन जाते. शाळेत परीक्षांचे वातावरण असते आणि बाहेर प्रसन्न वातावरण असल्यामुळे अभ्यासही छान होतो