वसुंधरा दिनानिमित्त होणार्या स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा मराठीमधे
Answers
Answer:
Step-by-step explanation:
मोठ्या अभिमानाने आम्ही आमच्या प्रियजनांबरोबर सर्व विशेष "दिवस" साजरे करतो. आम्ही माता दिन आणि वडील दिन साजरा करण्यास विसरू शकत नाही, मग आपण पृथ्वी दिवसासाठी तडजोड का करावी?
त्याला मातृ-पृथ्वी दिन म्हटले पाहिजे कारण पृथ्वी दिवस हा एक दिवस आहे जेव्हा आपण आपल्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो. पुढे येऊन आपल्या सुंदर आई पृथ्वीचा आनंद साजरा करण्यासाठी समाजातील संबंधित सदस्यांनी आयोजित केलेल्या प्रतिष्ठित कार्यक्रमाचा एक भाग व्हा. मुले आणि प्रौढांनी मनोरंजनासाठी आणि क्रियाकलापांसाठी एकत्र जमले पाहिजे तसेच आपली रिक्त जागा देऊ केलेल्या काही आश्चर्यांसाठी.
Answer:
Maharastra Books
12
11
10
9
8
7
6
5
Balbharathi Solutions
Skip to content
Menu
Maharashtra Board Solutions
Menu
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
October 1, 2021 by Bhagya
Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.1 सूत्रसंचालन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
11th Marathi Digest Chapter 4.1 सूत्रसंचालन Textbook Questions and Answers
कृती
खालील कृती करा.
प्रश्न 1.
उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये स्पष्ट करा.
उत्तरः
सूत्रसंचालनासाठी वाचन, श्रवण-निरीक्षण, चिंतन-मनन ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करावी लागतात. कोणत्याही सूत्रसंचालकाला प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करावी लागतात. सूत्रसंचालकाचा आवाज भारदस्त असावा. आवाजात सष्टपणा असावा. तो बोलताना कुठेही अडखळणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याची भाषा साधी, सोपी व श्रोत्यांना समजणारी असावी.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
अतिशय बोजड किंवा फार आलंकारिक भाषेचा वापर करू नये. सूत्रसंचालकाचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न असावे. त्याचा व्यासपीठावरील वावर आत्माविश्वासपूर्ण असावा. कार्यक्रमात निवेदन करताना व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मानपूर्वक परिचय करून देण्याचे व त्यांचा यथोचित नामोल्लेख व त्यांना अभिवादन करण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाकडे असणे गरजेचे आहे. कार्यक्रमात समयसूचकता, हजरजबाबीपणा, मिस्किलपणा असावा.
कार्यक्रमात आयत्या वेळी बदल करताना तो लीलया आणि सहजपणे करण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाकडे असावे. सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार असल्याने वक्ते, कलावंत यांना प्रोत्साहित करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असावे लागते. समोरचा वयोगट लक्षात घेऊन भाषाशैली, उदाहरणे, काव्यपंक्ती यांचा सुव्यवस्थित वापर करावा लागतो. आवाजाबरोबरच ध्वनिवर्धकाचा उत्तम सराव असणे अपेक्षित आहे.
कार्यक्रम हा बंदिस्त सभागृहात आहे की खुल्या मैदानावर यावर सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्या बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून त्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे. उत्तम सूत्रसंचालक हा चांगला निवेदक, वक्ता असावा. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सूत्रसंचालकाला तो-तो विषय समजला पाहिजे. उदा. सांगितिक कार्यक्रमात संगीताची जाण त्याला असणे गरजेचे आहे. सूत्रसंचालकाचे भाषेवर प्रभुत्व असावे.
सूत्रसंचालकाचा उदंड आत्मविश्वास हा त्याच्या सूत्रसंचालनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे. थोडक्यात सूत्रसंचालकाकडे प्रवाही भाषा, आत्मविश्वास, समयसूचकता, हजरजबाबीपणा, व्यासंग, देहबोली ही गुणवैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे आणि याच कौशल्यांतून तो उत्तम सूत्रसंचालक होऊ शकतो.
प्रश्न 2.
‘वसुंधरा दिनानिमित्त’ होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका तयार करा.
उत्तरः
जागतिक वसुंधरादिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रम पत्रिका
दि. २२ एप्रिल
पूर्वकथन :
दीपप्रज्वलन :
वसुंधरा गीत :
पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचे स्वागत :
प्रास्ताविक :
‘चला वसुंधरा वाचवू या’ शपथः
मा. उद्घाटक मनोगत :
स्पर्धकांचे सादरीकरण :
परीक्षकांचे मनोगत :
स्पर्धेचा अंतिम निकाल :
पारितोषिक वितरण :
मा. अतिथी मनोगत :
अध्यक्षीय मनोगत :
आभारप्रदर्शन :