Geography, asked by laibafaquih429, 6 months ago

वसईला मिळालेल्या विशेष म्हणजे काय

Answers

Answered by ananditanunes65
0

वसईची लढाई मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांच्यात इ.स. १७३९ साली लढली गेलेली लढाई होती. यात मराठ्यांचे नेतृत्त्व थोरले बाजीराव पेशवे यांचा भाऊ चिमाजी अप्पा याने केले. यात मराठ्यांनी पोर्तुगीज वसाहतकारांवर विजय मिळवला.

वसई हे शहर व बंदर आताच्या महाराष्ट्राच्या वायव्य भागात आहे. येथे १५व्या शतकापासून पोर्तुगीजांचे राज्य होते. वसईमध्ये मुख्य ठाणे असलेल्या पोर्तुगीजांची सत्ता रेवदंडा, कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या सात बेटांपर्यंत पसरलेली होती. येथील बंदरातून पोर्तुगीज धान्ये, मासे, लाकूड, बांधकामाचे दगड आणि घोडे युरोपात निर्यात करीत. येथील सत्ताधारकांनी आसपासच्या प्रदेशावर कडक अंमल ठेवलेला होता. देशात इतर ठिकाणी मुघल व इतर मुस्लिम सत्तांचा धुमाकूळ चालू असतानाही त्यांनी वसई व जवळच्या प्रदेशात आपली सत्ता कायम ठेवलेली होती.

१७२०मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून कल्याण काबीज केले आणि १७३०च्या दशकाच्या मध्यापर्यंत एकएक करीत ठाणे आणि साळशेत बेटावरील किल्ले घेतले. यात पारसिक, त्रांगिपारा, अर्नाळा (इल्हा दास व्हाकास), मनोर, आणि बेलापूर येथील किल्ले व तटबंद्यांचा समावेश होता.[१] पोर्तुगीजांनी रेवदंडा, कर्नाळा, वांद्रे, वर्सोवा, माहीम, केळवे, डहाणू, संजाण (साओ जेन्स), अशेरीगड (असेरिम), तारापूर, खुद्द वसई आणि दमण टिकवून धरलेले होते.

शंकराजीपंत फडके या सरदाराने चिमाजी अप्पाला कळवले, की वसईतील पोर्तुगीजांवर चाल करायची असेल या मोहिमेच्या सुरुवातीलाच मराठ्यांनी अर्नाळा किल्ला काबीज करणे गरजेचे आहे. शंकराजीने स्थानिक लोकांशी मसलत करून अर्नाळा घेण्यासाठी त्यांची मदत मागितली. गोविंदजी कासार आणि गवराजी पाटील या बोलिंज गावाच्या रहिवाशांसह गंगाजी नाईक अंजूरकर, बाजीराव बेलोसे आणि रायाजीराव सुर्वे हे मराठा सरदार ४०० सैनिकांचे पथक घेऊन खुश्कीच्या मार्गाने निघाले, तर दर्यासारंग मानाजी आंग्रे याने गुराबा घेऊन समुद्रावरून अर्नाळ्यावर चाल केली.

मार्च २८, इ.स. १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळ्यात गाफील असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावून किल्ला काबीज केला. या विजयाची स्मृती म्हणून किल्ल्याच्या उत्तरेकडच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख कोरण्यात आला; जो अजूनही शाबूत आहे. शंकराजीपंताने लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू केली व किल्ला पुन्हा भांडता केला. जानेवारी इ.स. १७३८पर्यंत तीन बुरूज बांधून तयार झाले. त्यांना भैरव बुरूज, भवानी बुरूज आणि बावा बुरूज अशी नावे देण्यात आली. मार्च महिन्यात किल्ला पूर्ण लढता झाल्यावर मराठा सैन्य आसपासच्या प्रदेशात पसरले व वर्सोवा तसेच धारावी या बेटांवर त्यांनी आपले बस्तान बसवले.

वसईच्या लढाईनंतर मराठ्यांनी उत्तर कोकणात आपला जम बसवला; तसेच आपल्या आरमाराला असलेले कायमचे भय घालवून टाकले. गोवा, वापी व दीव यांच्यातील टप्पा असलेले बंदर व ठाणे नेस्तनाबूद झाल्याने पोर्तुगीजांची भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पकड ढीली झाली. यात मराठ्यांबरोबरच इंग्रजांचेही फावले व त्यांनी आपले मुंबईतील ठाणे अधिकाधिक मजबूत करण्यास सुरुवात केली. वसई व मुंबईच्या आसपासच्या प्रदेशातील ख्रिश्चन प्रभाव कमी झाला व हिंदू धर्मीयांना आश्रय मिळाला. गोव्याप्रमाणे ख्रिश्चन धर्माचा पगडा येथील जनतेवर मोठ्या प्रमाणावर उरला नाही. मराठ्यांचे सैन्य उच्च तंत्रज्ञान असलेल्या पाश्चिमात्य सैन्यांशीही टक्कर घेऊ शकते, हे स्पष्ट झाले व बाजीरावाने सुरू केलेली मराठ्यांची आगेकूच चालू राहण्यास मदत झाली.

Hope this helps you

Please mark as brainliest

Similar questions