India Languages, asked by TransitionState, 11 months ago

वटपौर्णिमा मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख, इतिहास, महत्व

Answers

Answered by anamika233
0

Answer:

Marathi nahi aati Hai yrr

Answered by halamadrid
5

Answer:

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वट पौर्णिमा हा सण साजरा करतात.

या दिवशी सुवाशिनी बायका नववारी किंवा पारंपरिक साडी नेसून नटून-थटून,दागिने घालून वडाच्या झाडाची पूजा करतात.झाडाला हळद कुंकू वाहून,पाणी अर्पण करून झाडाच्या भोवती दोरा बांधतात.पाच सुवाशिनींची ओटी भरतात.

आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यसाठी आणि सात जन्मी हाच नवरा मिळो यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.या दिवशी बायका पूर्ण दिवस व्रत करतात जो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो.

या दिवशी वट सावित्री व्रत कथा वाचली जाते.या कथेनुसार सावित्रिने आपल्या हुशारी व पुण्याईने तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते.म्हणून या दिवशी बायका आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

वडाच्या झाडाचे फार महत्व आहे.हा झाड विशाल असल्यामुळे खूप सावली आणि भरपूर प्रमाणात वातावरणात ऑक्सीजन देतो.या झाडाचे आयुष्य भरपूर असते. तसेच ओषधी गुणधर्म देखील असते.याच झाडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवून आणले,म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.

Explanation:

Similar questions