vhकाळ्या मातीत मातीत तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो
सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाणतो मैना वाटुली पाहते
झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जीवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हां-जोंधळ्यात तवा सोनंचांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते
चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काटा पायात रुततो
काटा पायात रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं
appreciation plz
Answers
Answered by
0
bhai awesome kuch bhe samajh ni aya...
bhai27:
teri m
Similar questions