Vidyarthi Ani swawlamban speech in marathi
Answers
Explanation:
विद्यार्थी सतत सांगत असतात.
स्वतःच्या अपयशाचं कारण सतत इतरांवर ढकलत राहतात आणि आयुष्यभर अशीच मनोवृत्ती घेऊन जगतात. प्रत्येक गोष्टीसाठी हे विद्यार्थी दुसऱ्यावर अवलंवून आहेत. शाळा, शिक्षक, पालक, सुविधा या सर्व बाबी मिळाल्या तरच मी यशस्वी होईल अन्यथा नाही. अशी मनोवृत्ती बाळगणारे लोक आयुष्यभर परावलंबी राहतात आणि एक क्षण असा येतो की तेव्हा इतर कुणीच मदत करू शकत नाही. आणि हे लोक नैराश्यात, हिनत्वाच्या भावनेत खितपत पडतात. आज महाराष्ट्रात असंख्य युवक असे आहेत ज्यांना स्वतःची नोकरी मिळवता येत नाही.
स्वतःचा व्यवसाय करता येत नाही. त्याचा सतत इतरांना प्रश्न असतो की काय करू? प्रत्येक जण त्यांना निरनिराळे सल्ले देतात. परावलंबी माणूस सल्ला देणाऱ्याच्याच गळयात पडतो. आता हे साध्य करण्यासाठी मला मदत करा' अशा वेळी सल्ला देणारे पळ काढतात आणि हा परावलंबी युवक दुसऱ्या सल्लागाराचा शोध घ्यायला लागतो. परावलंबी लोकांना स्वतःच मत नसतं. ते बिनबूडाच्या लोटयासारखे असतात. जिकडे ढकललं तिकडे कलंडले. बऱ्याचदा वर्तमानपत्रातून बातम्या वाचायला मिळतात की नोकरीचे आमिष दाखवून अनेक युवकांना लाखो रूपयांचा गंडा घातला. यात बळी पडणारे हेच परावलंबी युवक असतात.