Vishesh kalaguni davakhanarya metrinila tiche abhinandan karnare patr liha
Answers
Answer:
अ. ब. क.
माध्य. विद्या. पिंपळेगुरव
पिंपरी, पुणे - ६१
८ सप्टेंबर, २०१२
मा. संपादक,
महाराष्ट्र टाइम्स,
पुणे कार्यालय
विषय : वृत्तपत्रातून पत्र प्रसिद्ध करणेबाबत
महोदय,
आज दिनांक ८ सप्टेंबर, १२ रोजी सुप्रसिद्ध गायिका श्रीमती आशा भोसले आपल्या वयाची ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा देण्यासाठी, आम्ही एक पत्र लिहिले आहे. तुमच्या वृत्तपत्रातून तुम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, ही नम्र विनंती.
आशाताईंची गाणी तर आम्ही रोजच ऐकतो; पण इयत्ता ८वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातून आम्हाला त्यांची 'विशेष' ओळख झाली. आशाताईंचा सुरेल प्रवास, अडचणींवर हसत हसत मात करत पुढेच जाण्याची वृत्ती आम्हा विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरली.
आनंदी, उत्साही आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या आशाताईंवर साऱ्या देशवासीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव आणि लतादीदी यांनी आशाताईंना दिलेला पत्ररूपी आशीर्वाद महाराष्ट्र टाइम्समधून वाचला. तो वाचून खूप आनंद झाला.
"आशाताई, तुम्ही अशाच गात राहा आणि आम्हा कानसेनांचे कान 'तृप्त' करत राहा."
तुमची वाचक