India Languages, asked by porwaldhruv73, 3 months ago

vruksharopan kalachi garaj ya vishyavar tumche matt liha​

Answers

Answered by indubalaporwal
0

Answer:

नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झालाय आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात.

निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्य जीवन जगणे सोपे झाले. तसेच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाडे.

झाडे आहेत मग आज आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक असलेल्या प्राणवायू मिळतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात‌.

आपण जर बारकाईने लक्ष दिले असता आपल्याला लक्षात येईल की, मनुष्याचे आयुष्य पृथ्वीवर टिकूनकोणवण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाचे भूमिका बजावतात.

सर्वच मनुष्याला सतत निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते. साधे आपण कुठेतरी फिरायला जायचा विचार केला असताना आपण निसर्गरम्य ठिकाण निवडतो. यामागचे कारण म्हणजे आपल्याला आजूबाजूचा हिरवागार आणि मनाला मोहित करणाऱा व आपल्या दृष्टीला शांत करणारा निसर्ग पाहायला खूप आवडतो.

आपल्यातील कोणी विचार करतो का हे वृक्ष नसते तर?

जर हे वृक्ष नसते तर, आपले जीवनच इतके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते. भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्याने आपल्या आजूबाजूच्या वन क्षेत्र कमी होत चालले आहे.

त्यामुळे कडक उन्हाळा, प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच आपले ऋतुचक्र ही बदलत चालले आहे.

त्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर “वृक्ष रोपण” करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Explanation:

Plz plz plz Mark me as brainliest

Similar questions