vrukshaya maza sobati eassy
Answers
Answer:
hope it will help you please mark me as brainalist and please follow me and please thank my answer.
Answer:
वृक्षांमुळे मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच त्यांच्यापासून फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. तसेच वृक्ष हे सर्व सजीवांना आणि मानवाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन प्राप्त करतात. त्याच प्रमाणे ते सजीवांना हानिकारक असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडला अवशोषित करतात.
मानव वृक्षांच्या लाकडाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. ग्रामीण भागातील लोक हे वृक्षांच्या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात. तसेच मानव घरे बांधण्यासाठी करतो.
मानव वृक्षांच्या लाकडापासून खिडक्या, दरवाजे आणि विविध प्रकारची तयार करतो. त्याच प्रमाणे उद्योगांना कच्चा माल सुद्धा तयार केला जातो. वृक्षांच्या लाकडापासून रबर, माचीस इ.केली जातात.
वृक्षांपासून अनेक प्रकारची औषधे ही तयार केली जातात. विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरातील अनेक आजार बरे करण्यास मदत करतात.
ज्या प्रमाणे मानवाला राहण्यासाठी घराची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे पशु – पक्ष्यांचे सुद्धा राहायला घर हवे असते. म्हणून निसर्ग हेच प्राणी आणि पक्षी यांचे निवास स्थान आहे. कारण बहुतेक पक्षी हे वृक्षांवर आपला घरटा बांधून राहतात
आपल्या सर्वाना वृक्षांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपण झाडे तोडण्याऐवजी जास्तीत – जास्त वृक्ष लावणे गरजेचे आहे. वृक्ष हे आपले खरे मित्र आहेत हे जाणून घेऊन आपण त्यांचे संगोपन आणि संरक्षण केले पाहिजेत.म्हणून आपल्या भारत देशात दरवर्षी १ जुलै पासून ७ जुलै पर्यंत वन दिवस साजरा केला जातो आणि सर्व लोकांना वृक्षचे महत्त्व पटवून सांगितले जाते.