India Languages, asked by Diksha1913, 10 months ago

vrutant lekhan in marathi on independent day
Plzz guyz answer this question if u know .
plzzzz​

Answers

Answered by SKSWAGBOSS
1

Answer:

Brainly.in

What is your question?

1

Secondary School India languages 10 points

Vrutant lekhan in marathi on independence day in school

Ask for details Follow Report by Cparmar8327 13.10.2018

Answers

rishitverma00

rishitverma00 Ace

आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट१९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या एतिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्ला “स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करतो.

माणूस असो वा देश असो स्वातंत्र्या सारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होतेआणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतात राज्य केले. तेवढ्या काळात आमचा ईतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनीकेले. भारतात शिक्षणाचा प्रचार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुंनाना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकर्यांना लुबाडले. स्व:त मालकीच्या चहाच्या मळ्यांची भरभराट साधण्यासाठी भारतीयांना चहाचे व्यसन लावले. असा अनेक प्रकारे भारतीयांना लुबाडले.

इंग्रजांचा कावेबाजपणा ओळखणार्या काहींनी त्यांच्या विरुद्ध शस्त्र उगारले. १८५७ स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई,नाना साहेब पेशवे यांनी गाजविले. पुढे सशस्त्र उठाव करून वासुदेव बलवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. आपला निषेध शस्त्रांन द्वारे नोंदविला.काहींनी इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकर, धिंग्रा यांनी तसेच प्रयत्न केले. लोकजागृती झाली, पण ती दडपली गेली. रानडे, टिळक,गोखले,आगरकर यांनी लेखणीचे आणि वाणीचे सामर्थ वापरून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम यांची जनतेला जाणीव करून दिली. भारतीय समाजाला आपली स्थिती सुधारण्याची प्रेरणा, जाणीव करून दिली. फुले इ. च्या शिकवणीने जातीयभेदाभेद किती वाईट आहे व त्याने समाज कसा दुर्बल होतो हे लोक शिकले.

कित्येक क्रांतीकारी फासावर गेले. टिळकांनी, सावरकरांनी आणि अशा अनेक क्रांतीवीरांनी तुरुंगवासातच उमेद घालविली. परंतु इंग्रजांनी यावर अधिकारपदे, मोठमोठ्या पदव्या, हक्क नसलेल्या कमिट्या यांच्या उपायांनी भारतातील जनतेत फुटाफुट निर्माण केली. फोडा आणि झोडा हे त्यांनी त्यांची सत्ता कायम ठेवण्यासाठी वापरलेले तंत्र होते. पुढे महात्मा गांधीच्या कडे देशाचे नेतृत्व आल्यावर पूर्वीच्या प्रयत्नांचा उपयोग होत नाही, असे पाहून त्यांनी सत्याग्रहाच्या व अहिन्स्तेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. त्याबरोबरच स्वदेशी, स्वालंबन, असहकार अश्या मार्गांनी सर्वत्र भारतीयांना इंग्रजां विरुद्ध आंदोलन करायला शिकविले. सरकारी जुलमी कायदे, अन्याय, नोकऱ्या यान विरुद्धसत्याग्रहाची मोहीम सुरु केली. गांधीजींना जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ.सहकार्य केले. सुभाषचंद्र बोस यांनी मोठ्या धाडसाने इंग्रजांच्या विरोधात “आझाद हिंद फौज” उभी केली.

अश्या प्रकारे अनेकांनी भिन्न भिन्न मार्गाने व अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले गेले आहे.आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे. आता भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे ते केलेच पाहिजे! त्यासाठी १५ ऑगष्ट हा दिवस आपण पवित्र सणा सारखा साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी आपण काही चांगले निश्चय करून देश हिताचे काम करायची शपथ घेतली पाहिजे. ध्वजवंदन करताना त्यापवित्र ध्वजाच्या साक्षीने हि शपथ घ्यायची असते.

आपले मुख्य अतिथी ध्वज फडकविल्यांनंतर जन- गण- मन हे राष्ट्र गीत म्हणून नंतर सर्वांनी ‘सावधान’ तेच्या पावित्र्यात झेंडा उच्या रहे हमारा’ हे गीत सामुदाईकपणे म्हणायचे असते. देशा साठी प्राण पणाला लावलेल्या क्रांती वीरांची आठवण करून देणारे हे गीत म्हणजे —– स्वर साम्राज्ञी लतादीदी च्या स्वरातील हे गीत एकल्या नंतर खरच त्या क्रांतीवीरांसाठी आपल्या भावनांना पाझर फुटते .. त्यांना आम्हा सर्वांचे शत शत: प्रणाम ! जय हिंद, जय भारत

ए मेरे वतन के लोगों , जरा आख में भर लो पाणी ।

जो शहीद हुए हैं उनकी , जरा याद करो कुर्बानी ।।

Explanation:

hope it helps

Similar questions