World Languages, asked by sajjandhanuka82, 9 months ago

vyayamache mahatva speech in Marathi​

Answers

Answered by avinash1610
1

Answer:

I couldn't understand your words pls look to it

Answered by harshitdpandey
4

Answer:

⏏️कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशीर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पीळदार दिसते खरे, पण अशा पीळदार शरीरयष्टी वाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोळामासाच असते, त्यांची बौध्दिक क्षमता बेताची असते, लहानशा अपघातने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात.  

⏺️शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांस धातूच्या पोषणासाठी वापरले जातात, परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते. थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानां पेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात.  

▶️बुध्दीचा व्याया म  

⏹️नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुदृढ आणि बलवान होतात तसेच बुध्दीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवाची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुध्दीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजे. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे कधीही न विसरण्या इतका पक्का होतो. अभ्यास शब्दाचा खरा अर्थ आहे ‘तीच तीच गोष्ट वारंवार करणे’. सतत काही काळ एका मंद ज्योतीकडे पापण्या न हलवता एकाग्रतेने बघण्याची सवय (त्राटक) करण्याने एकाग्रता (कॉन्सेंट्रेशन) वाढते, चित्त आणि दृष्टी पण सुधारते.

I hope it will help you ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

Explanation:

Similar questions