Want a marathi essay on vruksha nashta jhale tar for std 7
Answers
■■वृक्ष नष्ट झाले तर!!■■
वृक्ष आपल्या सगळ्यांसाठी तसेच पर्यावरणासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. वृक्ष नष्ट झाले तर,लोकांचे फार नुकसान होईल.
वृक्ष नष्ट झाले तर, आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन कुठून मिळणार?सजावटीसाठी व औषधी गुणधर्म असणारे पाने व फुले कुठून मिळणार?वृक्ष नसले तर खायला फळे सुद्धा मिळणार नाही.
वृक्ष नष्ट झाले तर, लोकांना उन्हाळ्यात सावली व पक्ष्यांना आसरा कुठून मिळणार?वृक्ष नष्ट झाले तर, घर बांधण्यासाठी,आग लावण्यासाठी व इतर उपयोगी वस्तू बनवण्यासाठी लाकूड मिळणार नाही.
वृक्ष नसल्यावर पर्यावरणावर गंभीर परिणाम होतील.पावसाचे प्रमाण कमी होईल.ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ होईल.वातावरणात थंडावा राहणार नाही.वायुची गुणवत्ता खराब होईल.निसर्गाचा तालमेल बिघडून जाईल.प्राण्यांचे जीवनसुद्धा संकटात येईल.
अशा प्रकारे, वृक्ष खूप महत्वपूर्ण असतात.त्यामुळे जर ती नष्ट झाली,तर आपले जीवन संकटात येईल.