want a marathi essey on vachal tar vachal
Answers
Answered by
6
आजच्या धक्काधक्कीच्या व्यस्त आधुनिक जीवनात, इंटरनेट, वायफाय असे अत्याधुनिक साधन आली खरी पण पुस्तक वाचन संस्कृतीचा -हास झाला. इंटरनेटच्या माध्यमातुन असंख्य वेगवेगळ्या क्षेत्राशी निघडीत पुस्तक एक क्लिक वर वाचता येऊ लागली. याचा परिणाम असा झाला कि, छापील पुस्तक साहित्य विकत घेऊन वाचणा-यांची संख्या कमी-कमी होत गेली. त्यात प्रत्येकाच्या जीवनातला वाढता कामाचा व्याप, व्यस्त जीवन पद्धतीमुळे मनाचा ताणतणाव वाढतच गेला. मग पुस्तक मित्रांशी प्रत्येकांचा मित्रत्वाच नातं दुर-दुर होत गेलं.
“पुस्तक म्हणजे आयुष्य मार्गदर्शक,
विचार प्रगल्भतेत वाढ करणारे ज्ञानाचे भांडार”
याचा जणु सर्वाचा विसरच पडत गेला. शालेय पाठ्यपुस्तकांचा, दफ्तराचा वाढता बोजा यांमुळे मुलांना अवांतर वाचनाकरिता वेळ मिळेनासा झाला. आजची तरूणाई सोशल नेटवर्किगच्या इतकी आहारी पडली की, पुस्तकवाचनच दुरापास्त होत गेले. पण आता वेळ आली आहे, हे सारं बदलुन पुस्तक मित्रांचे महत्व पटवुन देण्याची. पुस्तकाशी घट्ट मैत्री जोडण्याची तरच या वाचन संस्कृतीचा होणारा -हास थांबवता येईल. पुस्तकांच्या जगात एकदा डोकावुन तर पहा आपल्या ज्ञानार्जनाबरोबरच मनोरंजनही होईल. पुस्तकातील वेगवेगळ्या पात्रांचे, घटनांतील भाव, प्रेरणात्मक आशय मनातील नकारात्मक विचार दुर करून नवा उत्साह वाढवायला मदत करेल.
वाचनाचे फायदे आयुष्य जडणघडणीत, विचार सामर्थ्यात विशेष भर घालणारे, उज्वल भवितव्य घडविणारे असते. ‘वाचाल तर वाचाल’या विचारांप्रमाणे प्रत्येकांनी वाचनाचे महत्व जाणायला हवे. पुस्तकांशी प्रत्येकाने असलेले मैत्रीचे घट्ट नाते अबाधित राखायला हवे तरच वाचन संस्कृतीचा होणारा -हास रोखला जाऊन, उद्याचे सोनेरी वैचारात्मक प्रगल्भात्मक भविष्य साकारले जाईल.

Similar questions