Social Sciences, asked by Afxan9869, 1 year ago

Water pollution information in marathi language

Answers

Answered by crazybitch
81
जल प्रदूषण म्हणजे जलाशयांचे साठे उदा. तलाव, नद्या, समुद्र, विहीर, कालवे, सरोवरे इत्यादींचे पाणी दुषित होणे होय.
कारखान्यांचे रासायनिक दुषित पाणी नाल्यांद्वारे नदीपातत्रांत सोडले जाते, त्यामुळे जलप्रदूषण मोठया होताना दिसत आहे. या सर्व बाबींना माणूसच कारणीभूत आहे. अशाप्रकारच्या प्रदूषणामुळे मानवी जीवन मोठया धोक्यात येण्याची शक्यता आहे.
जल प्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे.

पाणी हे माणसाचे जीवन आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. ह तो विसरून गेला आहे आणि मोठया प्रमाणात जल प्रदूषण करत आहे. दुषित पाण्यापासून होणाऱ्या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जलप्रदूषण ही जागतिक स्तरावरील प्रमुख समस्या आहे. यासाठी सर्व स्तरांवर जलसंपदा धोरण आखून, संशोधन करण्याची गरज आहे. जगभरात दुषित पाण्यामुळे अनेक आजार पसरून लोक मरत आहेत.

जलप्रदूषणामुळे आज जगभरात प्रत्येक दिवशी १४,००० लोकांचा मृत्यु होत आहे. त्यात ५८० लोक भारतातून आहेत. चीनसारख्या मोठया देशातील ९०% पाणी प्रदूषित आहे आणि त्यातील १०% पाणीच पिण्यायोग्य आहे. वर्ष २००७च्या अनुसार चीनमधील ५० लाखाहून अधिक लोक हे शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.

ही समस्या जास्त करून औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांना मोठया प्रमाणात भेडसावते. पाणी साठून राहिले कि त्यात व्हायरस, जीवाणू, विषाणू, परजीव इत्यादींची वाढ होते.त्यापासून रोग पसरतात. पेट्रोल सारखे पदार्थ समुद्राच्या पाण्यात मिसळल्याने मोठया प्रमाणात जलप्रदूषण होते. जहाज गळतीमुळे अनेकदा जहाज अपघातही होतात. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी १ ते १.५०%च पाणी पिण्यायोग्य आहे. ९८% पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरुपात आढळते. जमिनीवर पिण्यायोग्य पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे त्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे.

जलप्रदूषणाची कारणे – :
१ रासायनिक पदार्थ पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते.
२ सांडपाणी, कचरा, प्लास्टिकच्या वस्तू पाण्यात फेकल्याने जलप्रदूषणात वाढ होते.
३ जनावरे, कपडे, भांडी अशा अनेक वस्तू नदीच्या पाण्यात धुतल्याने सगळी घाण पाण्यात मिसळते.
४ शेतीत फवारली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते.

जलप्रदूषणाचे परिणाम – :

१ जलप्रदूषणामुळे पाण्यात जीवाणूंची उत्पत्ती होऊन पाणी दुषित होते व रोगांचा निर्माण होतो. यात अतिसार (हगवण), उलटी, कवीळ, विविध प्रकारचे ताप, कोलेरा, मलेरिया, सर्दी, खोकला यासारख्या रोगांची लागण होते.
२ दुषित रसायनयुक्त पाणी पिल्याने त्याचा आपल्या किडन्यावर परिणाम होऊन किडन्या निकामी होण्याची समस्या उद्भवते.
३ नदीपात्रात कचरा साठल्यास पूर येण्याची शक्यता असत.

जलप्रदूषणावरील उपाययोजना – :

१ रासायनिक पदार्थ, तसेच रासायनिक पदार्थ मिसळलेले पाणी नदी – नाल्यात सोडू नये.
२ शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा.
५ शेडूमातीच्या मुर्त्या बनवून सण साजरे करावेत, सणांसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करून जलप्रदूषण टाळावे.
६ पाणी उकळून व गाळून प्यावे.
७ पिण्यायोग्य पाण्यात प्रदूषके मिसळण्यापासून थांबवणे खूप गरजेचे आहे.
जलप्रदूषणाची कारणे – :
१ रासायनिक पदार्थ पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते.
२ सांडपाणी, कचरा, प्लास्टिकच्या वस्तू पाण्यात फेकल्याने जलप्रदूषणात वाढ होते.
३ जनावरे, कपडे, भांडी अशा अनेक वस्तू नदीच्या पाण्यात धुतल्याने सगळी घाण पाण्यात मिसळते.
४ शेतीत फवारली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते.
Answered by isaacblagat
46

जल प्रदूषण

रसायने, जंतू, मानवी कचऱ्यासारख्या हानिकारक पदार्थांमुळे जल प्रदूषण झाले आहे आणि बहुतेक वेळा झाडे असलेल्या पाण्यामध्ये खराब जमिनीत मातीचा कटाव झाल्यामुळे मातीचा त्रास होतो.

दूषित पाणी मानवी वापरासाठी अयोग्य आहे कारण जेव्हा त्याचा वापर केला जातो तेव्हा मानवी पाचन तंत्रात गुंतागुंत होते. अशा पाण्याचे कारण अतिसार सारखे रोग होऊ शकते ज्यामुळे जास्त प्रमाणात पाण्याचे नुकसान होते.

आरोग्याचे आयुष्य टिकविण्यासाठी धूळ पाण्याचे टाळण्याचा सल्ला दिला जातो. नद्या, तलाव आणि महासागर सारख्या मोठ्या पाण्याचे साधन जल वाहतूक आणि औद्योगिक टाकावू पदार्थांपासून तेलाने दूषित केले जाऊ शकते ज्यामुळे मनुष्यांना आणि जनावरांचे प्राण्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो. दूषित पाणी मनुष्यांच्या त्वचेवर दुष्परिणामांचे प्रतिकूल परिणाम करते जे गंभीर नुकसानांमुळे होणारी बर्न होऊ शकते.

Similar questions