WEEKLY PLAN VI STD तुमच्या देशाबद्दल कर्तव्य व्यक्त करा
Answers
Answer:
Hey mate this is your answer
Explanation:
देशासाठी योगदान देण्याची इच्छा असेल, तर सीमेवर जाऊन लढायला हवं असं काहीह नाही. आदर्श नागरिक म्हणून देशाप्रती स्वत:चं कर्तव्य पार पाडणं हे देखील महत्त्वाचं आहे'...वीरपत्नी गौरी महाडिक यांचे हे शब्द विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. मुलुंडच्या एमसीसी कॉलेजमध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला...
देशाचं रक्षण करताना हुतात्मा झालेले मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी महाडिक लवकरच सैन्यदलात दाखल होत आहेत. प्रसाद यांच्या जाण्यानं खचून न जाता गौरी यांनी लष्करात दाखल होण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार, संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा उत्तीर्ण करून आता त्या सैन्यदलात दाखल होत आहेत. गौरी महाडिक या मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत. कॉलेजच्या महिला विकास कक्षानं 'जागतिक महिला दिना'च्या निमित्तानं गौरी यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित केलं. यावेळी त्यांचे शब्द ऐकताना विद्यार्थ्यांचा ऊर अभिमानानं भरुन आला होता. गौरी यांच्या सांगण्यातून देशभक्तीची एक नवी ओळख विद्यार्थ्यांना झाली.
गौरी यांच्यासोबत शिकलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सैन्यदलात दाखल होण्याचा संपूर्ण प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, की 'जीवनात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीसमोर झुकून न जाता धैर्यानं आणि एकजुटीनं त्याला सामोरं जायला हवं. देशासाठी योगदान देण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी सीमेवर जाऊनच लढायला हवं असं काही गरजेचं नाही. एक आदर्श नागरिक म्हणून आपलं स्वतःचं कर्तव्य न चुकता पार पाडणं देखील महत्त्वाचं आहे. देशाचं भविष्य हे तुम्हा युवा पिढीच्या हातात आहे आणि त्यासाठी तुम्ही सक्रियपणे काम करायला हवं.' इथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात जे कठीण प्रसंग आले त्यात माझे कुटुंबीय माझ्या मागे खंबीरपणे उभे होते, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
सैन्यदलात भरती होण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमांविषयी ऐकताना विद्यार्थी भारावले होते. त्यांनी दाखवलेली जिद्द, त्यांची उमेद यांना विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.
देशात अतिरेकी हल्ला की सगळे जण सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करतात आणि जवानांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतात. त्यापेक्षा तुम्ही भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा करा. ते शक्य नसेल तर, तुमच्या परिसरात राहणाऱ्या जवानांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दोन आनंदाचे क्षण साजरे करा.
please please please please please follow me