What do you like about rain? [in Marathi]]
Answers
पावसाळा किंवा पावसामुळे झालेले सृष्टीतील बदल.
उन्हाळ्यात ऊन खूप तापते . सारखा घाम येतो बाहेर फिरतानाही त्रास होतो . पावसाळ्यात मात्र हवेत गारवा यतो . सर्वांची मने शीतल होतात; म्हणून सर्वजण पावसाची वाट पाहतात.
पावसाळ्यात कधी पावसाची रिमझिम सुरू असते; तर कधी कधी तो धो धो कोसळतो. सगळीकडे पाणीच पाणी होते . नदी-नाले भरून वाहतात विहिरी-तलाव भरून जातात. सगळीकडे हिरवीगार वनश्री पसरते . शेतात पिके डोलू लागतात .वातावरण आल्हाददायक असते . सगळी सृष्टी जणू आनंदाने हसत असते .
आम्हाला पावसात खूप आनंद मिळतो . मोर रानात नृत्य करतात . बेडकांची ' डराव डराव' असा आवाज घुमू लागतो . पावसाळ्यात संध्याकाळ फारच सुंदर असते . सुर्यप्रकाशामुळे ढग रंगीबेरंगी बनतात . आकाश विविध रंगानी भरून जाते . कधी कधी आकाशात इंद्र्धनुष्यही दिसते .
thank you
Make my answer brainlist plz plz plz plz plz
पावसाळ्यात पडणारे पाणी . पाण्याचालू आवाज. टप टप टप....पावसाचे हेच संगीत ऐकताना मजा वाटते. थंडगार हवा आणि
हिरवीगार झालेली झाडे मन मोहून टाकतात.
त्यात भर म्हणजे कांदा भजीची .म्हणजे दूधात साखर.
सगळी झाडे हिरवी साडी घालून नटलेली
असतात . उंच कड्यावरून पडणारे धबधबे
मन हिरावून घेतात.