What is defence between hasa chitra and vanga chitra in marathi
Answers
Answer:
उद्दिष्ट्ये :- विद्यार्थ्यांना हास्यचित्र व व्यंगचित्र या दोघांमधील फरक समजणे. सामाजिक प्रश्नांची जाणीव असणे.
मला नेहमी वाटते की शिकविणे हे कंटाळवाणे न होता ते मजेशीर कसे होईल? याचा प्रयत्न मी नेहमी करते. त्यामुळेच इयत्ता नववीला ” हास्यचित्र व व्यंगचित्र ” हा स्थूलवाचनाचा कंटाळवाणा पाठ मी विद्यार्थ्यांना त्यांच्याच कलेने म्हणजे उपक्रमांच्या माध्यमांतून शिकविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विद्यार्थाना याची पूर्वकल्पना दिली. त्यासाठी विद्यार्थ्यांचे संघ तयार केले. ते करत असताना सर्व प्रकारचे विद्यार्थी त्यात सहभागी करून घेतले. जसे वर्गात असलेले शांत व काही मस्तीखीर विध्यार्थी यांना एकत्र करून संघ तयार झाले.
हास्यचित्र व व्यंगचित्र शेरॉन शाळेचे ब्लॉग्स
हास्यचित्र व व्यंगचित्र -1
शेरॉन शाळेचे ब्लॉग्स हास्यचित्र व व्यंगचित्र
शेरॉन शाळेचे ब्लॉग्स
दुसऱ्या दिवशी विद्यार्थांना येताना उपक्रमाबद्दल थोड्या कल्पना / आयडिया घेऊन येण्यास सांगितल्या. दुसऱ्या दिवशी मी व माझे विद्यार्थी दोघे ही उत्सुक होतो, काही नवीन करण्यासाठी त्यामुळे मी वर्गात प्रवेश करताच विध्यार्थी तयार झाले. मी ही विद्यार्थ्यांचे व्यंगचित्र बघण्यासाठी उत्साही होते. हळूहळू उपक्रमाला सुरुवात झाली. जे विध्यार्थी वर्गात मस्तीखोर होते ते सुदधा आपल्या कामात तल्लीन झाले. प्रत्येक जण आपल्या संघाला मदत करत होते. व्यंगचित्रांचा उपक्रम तयार होत असतांना माझ्या लक्षात आले की, सामाजिक प्रश्न, आजूबाजूच्या राजकीय घडामोडी यांचा अंदाज विद्यार्थ्यांना होतो. हे बघून मला खूप आनंद झाला. हळूहळू व्यंगचित्र तयार होण्यास सुरुवात झाली. एका यंगचित्रात विद्यार्थ्यांनी मुलगा आपल्या वडिलांकडे खेळण्याच्या परवानगीसाठी कोणकोणत्या युक्त्या वापरतो हे दाखवले. दुसऱ्या व्यंगचित्रात झाडाच्या एका डोळ्यात आसू व दुसऱ्या डोळ्यात हसू दाखवले. तिसऱ्या व्यंगचित्रात नदीत आता पाणी नाही. प्लास्टिकचा कचरा मिळतो. म्हणजेच विद्यार्थ्यांना एकंदर सर्व सामाजिक समस्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दाखविल्यामुळे आनंद झाला. व माझे काम सोपे झाले. जे हसवत एक गंभीर संदेश आपल्याला देते. हे त्यांना समजले.
हास्यचित्र व व्यंगचित्र