What is panyache mahatva essay in marathi
Answers
पाण्याचे महत्व means Importance of water. Here is the Essay for you.
पाण्याचे महत्व
पाणी म्हणजे जल, आणि जल हे जीवन आहे या वाक्यावरण पाण्याचं या सृष्टीवर काय महत्व आहे ते जाणवते. कारण पृथ्वी वरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे.
पृथ्वी वरील सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सदासर्वकाळ योग्य व पुरसे ठेवावे लागते. शरीरातील पाण्याच प्रमाण १० टक्कयाहून कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही. मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे जीवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय सात दिवसापेक्षा जास्त दिवस तो जगूच शकत नाही.
मनुष्याला फक्त पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी पाणी हेच माध्यम आहे. शेती करण्याकरता तर पाण्याची गरज सर्वात मोठी आहे..
दिवसें न दिवस वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, जंगल तोड, जल प्रदूषण, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यांच्यामुळे पाणी ची टंचाई जाणवत आहे. व हा एक गंभीर मुद्दा बनला आहे. आणि पाणी टंचाई चा प्रश्न मनुष्यच सोडवू शकतो. जर प्रत्येक व्यक्ती पाण्याचे महत्व समजून त्याचा सांभाळून उपयोग करेल तर मग कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही. म्हणतात न थेंबे थेंबे तळे साचे.