what is swachateche mahatva
Answers
स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सध्या चर्चेचं मुख्य स्थान बनली आहे. ह्या मोहिमे अंतर्गत वेगवेगळे स्वच्छ तेचे कार्यक्रम हाती घेतले जातात. देश स्वच्छ, सुंदर रहावा ही ह्या मागची इच्छा. असाच एक कार्यक्रम म्हणजे "ग्राम स्वच्छता अभियान"
कुडाळ ह्या गावामध्ये कचऱ्याचे प्रमाण खूप वाढत असल्याने तिकडच्या लोकांनी स्वतः गाव साफ करण्याचा निर्णय घेतला. कचरा व्यवस्थापन, कचरा कुंडी वर्गीकरण ह्या सारखे अनेक उपक्रम पार पाडण्यात आले. लोकांनी आपल्या हातात झाडू, घमेले घेऊन कचरा साफ केला व गाव स्वच्छतेच्या मार्गाकडे वळू लागले. आता गावात जो माणूस कचरा करेल त्याला दंड देखील ठेवण्यात आले आहे. जेव्हा गावकऱ्यांनी जागेच निरक्षण केले तेव्हा त्यांना असे आढळून आले की गावाकडच्या नदी कडे खूप प्लास्टिक, कचरा असतो. नदीपात्र साफ केल्या नंतर तिकडे कुंपण बांधण्यात आले जेणे करून लोक कचरा त्यात टाकतील व परिसर स्वच्छ राहील. हे अभियान पार पाडताना लोकांना खूप कठीण परिस्थिती अनुभवास लागल्या उदा. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव इत्यादी. तरी परिस्थिती वर मात करता लोकांनी नारे व घोषवाक्य बोलून हे अभियानाला पार पाडले.
अश्या प्रकारे गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व समजले व त्यांनी ते आंगी बाणावले.