India Languages, asked by souravacharya53, 5 months ago

what is vibhakti and samanyaroop in marathi
plz answer this question fast​

Answers

Answered by devajinivale
0

Explanation:

नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.

नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’असे म्हणतात.

नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचाअसतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता

व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म

तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण

चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान

पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान

षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध

सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण

संबोधन – नो – संबोधन

सामान्य रूप :

विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ स्वरुपात जो बद्दल होतो त्याला ‘सामान्य रूप’ असे म्हणतात.

उदा.

घोडा: घोड्यास, घोड्याला, घोड्याने, घोड्याचा.- या सर्व शब्दांमध्ये ‘घोड्या’ हे सामान्यरूप.

पाणी: पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – या सर्व शब्दांमध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप.

Similar questions