who is lulli yadav ??
Answers
Explanation:
hope it's helpful to you
is it
Explanation:
नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल (RJD) चे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री ७३ वर्षीय लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना शनिवारी संध्याकाळी AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लालू प्रसाद यादव यांना चार्टर्ड विमानाच्या माध्यमातून एअर ऍम्बुलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि बिहारची माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि मुलगा तेजप्रताप आणि तेजस्वी यादव देखील सोबत होते.
रांची RIMS च्या डॉक्टरांनी केलं दिल्ली रॅफर
या अगोदर रांचीच्या राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइन्सस (RIMS) ची आठ सदस्यांच्या टीमने एम्स रुग्णालयात दाखल केलं. RIIMS मध्ये आठ सदस्यांची टीम बनवण्यात आली. त्यानंतर चांगल्या उपचारासाठी त्यांना AIIMS मध्ये दाखल करण्यात आलं.
लालू यादव यांना निमोनियाची लागण
लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी ईको, (ईसीओ, ईसीजी, अल्ट्रासाऊंड, केयूबीपी आणि एचआरसीटीसह अनेक टेस्ट केल्या आहेत. निमोनिया सोडून कोणताही इतर त्रास नसल्याचं म्हटलं जात आहे. लालू प्रसाद यादव यांच्या हृदयात आणि किडनीत संक्रमण झाले आहे. याबाबतची अधिक माहिती इतर टेस्टमध्ये मिळेल. चारा घोटाळ्या प्रकरणातील आरोपात लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना १४ वर्षांच्या कारागृहाची शिक्षा सुनावली होती. गेल्या २९ महिन्यांपासून ते रिम्सच्या पेइंग वॉर्डमध्ये राहत आहेत. ५ ऑगस्ट रोजी त्यांना कोविड-19 ची लागण झाल्याची शक्यता वर्तवल्यामुळे त्यांना बंगल्यात स्थलांतरीत करण्यात आलं.