History, asked by chjkyt, 10 months ago

Who were dharma Maharashtras? what did they do? ​


Anonymous: don't no

Answers

Answered by pavar0108
2

महाराष्ट्रामध्ये अनुसरले जाणारे विविध धर्म हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. महाराष्ट्रात जगातील किमान आठ धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, पारशी धर्म आणि यहुदी धर्म होय. महाराष्ट्राच्या इतिहासात धर्म हा राज्याच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे. याशिवाय महाराष्ट्रात कोणताही धर्म वा पंथ न मानणारे असंख्य नास्तिक लोक आहेत.

भारताचे संविधान राज्याला एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित करते, त्यामुळे भारतीय नागरिकाला कोणत्याही धर्माची किंवा विश्वासाची उपासना करणे वा कोणताही धर्म न पाळणे आणि त्या विचारसरणीचा प्रसार करणे याचे स्वातंत्र्य वा मुभा आहे.[१][२] भारताच्या राज्यघटनेनसार धर्मस्वातंत्र्य हा भारतीय व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे.

Similar questions