Environmental Sciences, asked by rajpalnamberdar9867, 1 year ago

wikipedia of sureshchandra nadkarni

Answers

Answered by DipakSurve
0

Answer:

. सुरेशचंद्र गंगाराम नाडकर्णी (इ.स. १९२९ - २२ जुलै, इ.स. २०११:पुणे) हे एक मराठी लेखक, गझलचे अभ्यासक, संगीततज्ज्ञ व प्राणिशास्त्राचे प्राध्यापक होते. ते मर्मज्ञ गझलकार होतेच, शिवाय विविध खेळांचे ते आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त क्रीडासमीक्षक होते. क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे ते बंधू होत.

डॉ. नाडकर्णी यांचा गझल आणि रुबाई या दोन्ही काव्यप्रकारांचा मुळातून अभ्यास होता. उर्दू काव्यावर त्यांनी पीएच. डी. मिळवली होती. मराठी आणि उर्दू या दोन्ही भाषांत हे दोन्ही काव्यप्रकार विपुल प्रमाणात हाताळलेल्या नाडकर्णी यांच्या रचनांचे ' उंबराचं फूल ' हे पुस्तक, तसेच ' गजल ' हे गजल या काव्यप्रकाराला वाहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे. कविवर्य सुरेश भट हे नाडकर्णी यांचे मित्र आणि प्रेरणास्थान होते. उर्दू गझला तर ते खूप आधीपासूनच लिहीत होते. पण भट यांच्या आग्रहामुळेच नाडकर्णी यांनी मराठीत गझला आणि रुबाया लिहिल्या. भटांच्या गजलेची परंपरा नाडकर्णी यांनी समर्थपणे पेलली.

Similar questions