India Languages, asked by pradeepvisvanat5675, 1 year ago

Without education life is waste essay in Marathi

Answers

Answered by Anonymous
0

Explanation:

मूल्ये नसलेले शिक्षण, संपूर्ण कचरा आहे. मूल्ये अधिक महत्वाची असतात, मूल्य समाजातील एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवते. एकट्या शिक्षणामुळे महान व्यक्तिमत्त्व निर्माण होऊ शकत नाही परंतु जेव्हा मूल्यांच्या बरोबरीने त्याचे परिणाम आश्चर्यकारक ठरतात.

Answered by AadilAhluwalia
0

*शिक्षणाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे*

शिक्षण हे माणसाचा आयुष्यात खूप महत्वाचे आहे. शिक्षण माणसाला साक्षर बनवतो. काय चुकीचे आहे, काय बरोबर याची समज आपल्याला शिक्षणामुळे येते. शिक्षित असल्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. शिक्षण आपल्याला बोलण्याची - चालण्याची व चार लोकांत वावरण्याची पद्धत शिकवतो. शिक्षित माणूस नेहमीच समाजाला फायदेशीर ठरतो. शिक्षणामुळे आपल्याला आयुष्याला एक ध्येय मिळते, एक लक्ष्य मिळते. शिक्षणामुळेच माणसाच्या आयुष्याला किंमत येते.

जर शिक्षण नसेल तर आपल्याला खूप गोष्टींना मुकावे लागते. शिक्षण नसल्यामुळे माणूस चुकीचे पाऊल उचलू शकतो. त्यामुळे माणसाची दिशाभूल सुद्धा होऊ शकते. शिक्षण नसले तर आयुष्याला अर्थ मिळत नाही. शिक्षण नसले तर ध्येय समोर नसते, म्हणून माणूस भरकटू शकतो. एखादे लक्ष्य न असल्यामुळे जगण्याचे काही सार्थ नसते. म्हणून शिक्षणाशिवाय जीवनाला अर्थ नाही.

Similar questions