India Languages, asked by princess7923, 11 months ago

write 15 lines on the importance of time in marathi​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

Explanation:

वेळ ही फार मूल्यवान गोष्ट आहे.अनेक गोष्टी विकत मिळतात,पण वेळ विकत मिळत नाही.

आपण पैसे साठवल्यावर, आपल्याकडे खूप पैसे जमतात.मग आपण त्यांचा योग्य उपयोग करतो.अशा प्रकारे, वेळ साठवून ठेवता येत नाही.वेळ निघून जातो.तो परत मिळत नाही.म्हणून वेळेचा चांगला उपयोग केला पाहिजे.प्रत्येक गोष्ट वेळेवर केली पाहिजे.

जगातील सगळ्या मोठ्या माणसांनी वेळेचे महत्व समजले व त्यांनी आपली कामे वेळेवर केली.शास्त्रज्ञांनी सतत वेळेवर काम केले.खूप शोध लावले.म्हणून आपल्याला पंखे,दिवे,रेडियो,टीव्ही अशा गोष्टी मिळाल्या.वेळेवर काम केल्यामुळेच आपल्याला यश मिळते.

वेळ फुकट घालवणे वाईट आहे.आळस हा आपला शत्रू आहे.आपण आळस सोडून दिला पाहिजे.तरच आपल्याला यश मिळेल.

Answered by radhikaprettysmile98
1

Answer:

Time is a precious.

Explanation:

Similar questions