Write 5 lines about diwali in marathi
Answers
दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 12 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवणी म्हणून साजरा केला जातो. राम हा एक अतिशय लोकप्रिय हिंदू देवता आहे जो आपल्या सत्यतेबद्दल आणि शुद्धतेसाठी आदरणीय आहे.
दिवाळीला दीपावली सुद्धा म्हटले जाते. दिवाळी ला सर्वजण आपापल्या घरी भरपूर दिवे लावतात. संपूर्ण भारतभर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान राम यांच्या राज्यात अयोध्येत परत आलेल्या स्मारकासाठी प्रत्येक वर्षी हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक धार्मिक विधी केल्या जातात
keep smiling ❣️
Answer:
Explanation:
सर्व सणांमध्ये दिवाळी हा माझा आवडता सण आहे . दिवाळी हा सन अश्विन महिन्यात येतो . त्यावेळी शाळेला सुट्टी असते .
दिवाळीच्या दिवसांत आमच्या घरी खूप धामधूम असते . आम्ही घर सजवायला दारावर तोरण बांधतो . मी आणी ताई घरीच कंदील करतो . लाडू, करंज्या , चिवडा , चकल्या असे वेगवेगळे पदार्थ आई बनवते . त्यावेळी तिला आम्ही मदत करतो .
आईबाबा दिवाळीला आम्हांला नवीन कपडे घेतात . नवीन कपडे घालून आम्ही आनंदाने फिरतो . आम्ही खूप फटाके वाजवतो . मित्रांबरोबर खेळतो आणि भरपूर भटकतो .
दिवाळीच्या दिवसांत आम्ही दारात रांगोळी काढतो . संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करतो . भाऊबिजेला ताई मला ओवाळते . मी तिला भेटवस्तू देतो .
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे . तो आनंदाचा सण आहे . दिवाळी सगळीकडे उल्हास असतो . म्हणून दिवाळी हा सण मला खूपच आवडतो .