write a complaint letter in Marathi to mahanagar palika about drudgery in your nearby area
Answers
Please mark as brainliest
Answer: अ.ब.क.
१२, विश्रांती निवास,
नाशिक- १२२३४६
दि- १२ जुलै, २०१९.
प्रति,
महापौर,
महानगरपालिका,
नाशिक- १२२३४६.
विषय- कर्मचा-यांच्या कामचुकारपणाबद्दल तक्रार.
महोदय,
मी, अबक, माझ्या विभागातील सर्व रहिवाशांच्या वतीने आपणांस हे पत्र लिहित आहे. गेले काही दिवस आमच्या विभागात पालिका कर्मचाऱ्यांचे व्यवस्थित लक्ष नाही त्यामुळे ब-याच गैरसोयी निर्माण झाल्या आहेत.
गेले काही दिवस आमच्या विभागातील कचरा उचलण्यात आलेला नाही. तसेच आम्हाला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अशाने आमच्या विभागात रोगराई पसरू शकते. रहिवाशांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालावे ही विनंती अन्यथा आम्हांला कठोर पाऊल उचलावे लागेल.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू,
अबक
Explanation: