write a essay on any topic which has high level marathi .
some topics are given below from which you can choose:
my favourite festival
the most beautiful animal
my mom / dad
Answers
ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृतीसुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो.
कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.
Answer :
आपल्या सर्वांना चांगले आरोग्य आणि निरोगीपणाचे महत्त्व समजणे फार महत्वाचे आहे.या दिवसात जीवनशैलीच्या आजारांमुळे अचानक वाढ झाली आहे.हे केवळ प्रौढ लोकांसाठीच नाही तर तरुण पिढीचा देखील एक भाग बनला आहे.यामागील कारणे बरीच आहेत परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शारीरिक व्यायामाचा अभाव. हे पाहून खेदजनक आहे की आज बहुतेक मुले आत बसून आपल्या गॅझेट्ससह खेळण्यास प्राधान्य देतात.त्यांना बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारच्या शारीरिक क्रियेत सामील होऊ इच्छित नाही.ते तंत्र-जाणकार जगामध्ये व्यसनी आहेत. ते आभासी जगात राहणे पसंत करतात.आपण तंत्रज्ञानाच्या नियंत्रणाखाली नसावे परंतु ते आपल्या नियंत्रणाखाली असले पाहिजे हे आपल्या प्रत्येकाने समजून घेणे फार महत्वाचे आहे.आपण तंत्रज्ञानाचा उपयोग जीवनाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे आणि आपले आरोग्य खराब करू नये.बाहेर खेळण्याचे बरेच फायदे आहेत. यामुळे शारीरिक व्यायाम, सामाजिक संवाद, बाह्य जगाचा संपर्क, टीम बिल्डिंग इ.एक प्रकारे ते आपल्याला निरोगी जीवनशैली प्रदान करते.
Now importance of good health on Beauty :
'आरोग्य ही संपत्ती आहे' यात काही शंका नाही.
- केवळ निरोगी व्यक्तीची त्वचा सुंदर आणि चमकणारी असते.
- आम्ही सुंदर दिसण्यासाठी महागडे कपडे आणि दागदागिने वापरू शकतो, परंतु केवळ निरोगी व्यक्तीचे केस चमकदार व चमकदार असतात.
- एक निरोगी व्यक्ती चमकदार, सक्रिय आणि आकर्षक असेल.
- सर्व सौंदर्यप्रसाधने देखील निरोगी चमक मिळविण्यासाठी आपल्या ग्राहकांवर त्वचेचे आणि शरीराचे डिटॉक्सिफाय करुन त्यांचे काम सुरू करतात.
- सुंदर राहण्यासाठी आपण व्यायाम करून स्वस्थ अन्न खायला हवे.