India Languages, asked by heet1896, 3 months ago

write a essay on कोरोना संकट in marathi ​

Answers

Answered by umarfarooq481214
0

Answer:

Please type the name of essay also in English

Answered by sandipthete3
2

Answer:

कोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे, तसाच भाषाव्यवहारही बदलणार आहे. या बदलाची तयारी ज्या भाषा करतील त्याच भविष्यात टिकणार आहेत.भाषेसारख्या गोष्टीचा आणि तो देखील मराठीसारख्या स्थानिक भाषेचा कोरोनाशी काय संबंध? असा प्रश्न लेखाचे शीर्षक वाचल्यावर कोणाच्या मनात येऊ शकतो. त्यासाठी लेखाच्या सुरुवातीलाच याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. कोरोनानंतरचे जग वेगळे असणार आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. जगभरातील कंपन्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी या नव्या जगाचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. माणसामाणसातील नात्यांपासून, देशादेशांमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत अनेक समीकरणे कोरोनानंतरच्या जगात हळहळू बदलत जातील, असे संकेत मिळू लागले आहे. त्याबद्दल सर्वत्र लिहिले जाऊ लागले आहे. या सगळ्या बदलत्या जगाचा व्यवहार ज्या भाषेत चालणार, त्या भाषेबद्दलचा विचारही म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.हे अधिक स्पष्ट व्हावे यासाठी आपण एक सोप्यात सोपे उदाहरण घेऊ. ‘वर्क फ्रॉम होम’ हा कोरोनामुळे दिसलेला प्रमुख दृश्य बदल आहे. आजवर कधीही केले गेले नाही, अशी घरून काम करण्याची वेळ आज अनेकांवर आली आहे. पण, हा बदल तात्पुरता नसून, आता हीच कार्यपद्धती कायमची करता येईल का, याचा जागतिक पातळीवर विचार होतो आहे. टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्विस) सारख्या कंपन्यांनी २०२५ पर्यंत आपली ७५ टक्के कर्मचारी घरून कसे काम करतील, या दिशेने कामही सुरू केले. जगभरात हे होत आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांनी ‘लर्न फ्रॉम होम’ सारख्या घोषणा करत शिक्षणही ऑनलाइन करायला सुरुवात केली आहे.

Similar questions