write a essay on Mera Maharashtra in marathi
Answers
माझा महाराष्ट्र
माझ्या महाराष्ट्राने अनेक क्षेत्रांत माझ्या भारताची गौरवपताका फडकवली आहे. म्हणूनच, मी महाराष्ट्रीय आहे, याचा मला अभिमान वाटतो.
माझ्या महाराष्ट्राला समृद्ध भूमी लाभली आहे. कृष्णा, कोयना, गोदावरी यांसारख्या अनेक नदया महाराष्ट्रात आहेत. पश्चिमेला सहयाद्री पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. इथल्या माणसांची मने या सह्याद्रीसारखीच भक्कम आहेत. इथले लोक कष्टाळू आहेत. त्यांनी महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. आज महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, फुलाफळांनी समृद्ध आहे. आज संपूर्ण भारतात महाराष्ट्र उदयोगांच्या बाबतीत आघाडीवर आहे.
महाराष्ट्राला वीरांची व संताची फार मोठी परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीच या महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे तोरण बांधल. बलाढ्य इंग्रजांना हादरवणारे लोकमान्य टिळक या भूमीतच जन्मले. महाराष्ट्र ही नररत्नाची खाण आहे. साहित्य व कला या क्षेत्रांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. मुबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती भारताची आर्थिक राजधानी आहे.
असा हा महाराष्ट्र मला खूप खूप प्रिय आहे.
Answer:
hi
Explanation: