Social Sciences, asked by swarapatil, 10 months ago

write a essay on meri grandfather in marathi​

Answers

Answered by xShreex
42

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

माझे आजोबा

'आबा, काय करताय तुम्ही?' हा प्रश्न दिवसातून दोन-चार वेळा आम्ही आमच्या आजोबांना विचारतो. आम्ही त्यांना 'आबा' म्हणतो. आमचे आबा आज सत्तरीला पोहोचले आहेत. ते नेहमी कशात ना कशात गुंतलेले असतात!

आबा आता सेवानिवृत्त आहेत, पण दैनंदिन कामांतून निवृत्त झालेले नाहीत. गोरेपान, काटक अशा आबांचे वागणे अगदी नियमित असते. सकाळी फिरून आले की, ते देवपूजा करतात. त्यांची सर्व कामे ते स्वत: करतात. मग माझ्या आईला विचारून ते बाजारपेठेत जातात; घरात लागणाऱ्या वस्तू घेऊन येतात. दुपारभर त्यांचे वाचन व दुरुस्तीची कामे चालू असतात. घराची स्वच्छता करण्याचे काम त्यांना आवडते. कोणी अस्वच्छता केली किंवा वस्तू अस्ताव्यस्त ठेवल्या, तर ते चिडतात. बागेची निगाराखणी करणेही त्यांना आवडते.

संध्याकाळी आबा त्यांच्या मित्रांच्या गप्पांमध्ये रंगलेले असतात. आमच्या अभ्यासातल्या अडचणी ते सहज सोडवतात. रात्री ते दूध व फळे घेतात आणि संगीत ऐकत झोपी जातात. सर्वांना मदत करण्यास ते सदैव पुढे असतात.

Similar questions