write a letter in Marathi on तुमच्या घरी मकरसंक्रांतीचा सण आनंदात साजरा करण्यात आला त्याचे वर्णन करणारे पत्र तुमच्या आत्याला लिहा:-
Answers
Explanation:
अनौपचारीक पत्र
विकास रूठे,
रूठेवाडी ,
रोठगाव ,
ता. राठी
दिनांक. 15 जानेवारी 2022
प्रिय आत्या,
साष्टांग नमस्कार,
प्रिय आत्या मागील पत्रात तू खुशाली कळवण्यास सांगितले होते. तर आम्ही मजेत आहोत. तू कशी आहेस? चांगलीच असणार अशी. आशा बाळगतो . आत्या कालच मकरसंक्रांतीचा सण होता . मी तर काल खूप मज्जा केली. खरंतर हा सण सगळ्यांसाठी चांगला असतो.
तर आमच्या घरी सकाळी सगळे लवकर उठले .पण आज सगळ्यांमध्ये आनंदी उत्साह होता . आवरल्यानंतर घरातील लहानांनी थोरा-मोठ्यांच्या पाया पडून तिळगुळ घेतले .आई, ताई आणि आजी स्वयंपाकासाठी जुंपले . आजोबांनी मला पतंग तयार करून दिली आणि मी मित्रांसोबत खेळायला गेलो . बाबा त्यांच्या मित्रमंडळींना तिळगुळ देण्यासाठी गेले.
स्वयंपाक होईपर्यंत बाबा आणि मी घरी आलो. मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो.जेवणात पुरण-पोळी, सार -भात , भजे , कुरडई हे सर्व पदार्थ होते . सर्वांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला.संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण घरी आले.आम्ही ही त्यांना तिळगुळ दिले. आत्या असा आमचा मकरसंक्रांतीचा सण आनंदाने साजरा झाला.
आत्या मामा कसे आहेत ? त्यांना माझा नमस्कार सांग .राघव आणि पिंकीला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांग. लवकरात लवकर तुझी खुशाली कळव .
तुझा प्रिय भाचा
विकास