write about the अवशेषांगे (Vestigial organs) in marathi
Answers
सजीवांमधील हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना 'अवशेषांग म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी. एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते; परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात.
__या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखादया सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो, म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत. माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात.