History, asked by Anonymous, 8 months ago

write about the essye on माकडांची शाळा in Marathi short paragraph ​

Answers

Answered by xShreex
0

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

माकडांची शाळा

मी शाळेतून घरी चाललो होतो. वाटेत माकडवाल्याचा खेळ दिसला. माकडवाला जसे सांगत होता, तसे ती दोन माकडे करत होती. माझ्या मनात आले की, माकडे कमी शिकत असतील? त्यांची शाळा कशी असेल?

एकदा मी दूरदर्शनवर 'डिस्कव्हरी' वाहिनी पाहत होतो. त्या वेळी माकडांवरील कार्यक्रम चालू होता. मी आनंदाने पाहू लागलो.

माकडांची एक टोळीच असते. अगदी लहान पिले आईच्या पोटाशी बिलगून असतात. इतर पिले खेळत होती. पकडापकडी हा खेळ चालू होता. मध्येच काही पिले मारामारी करत होती. मारामारी वाढल्याबरोबर त्यांच्या आईने एकेकाच्या शेपटीला धरले आणि त्यांना दूर ढकलले. एक पिलू झाडावर चढत होते आणि पडत होते. असे खूप वेळा झाले. अखेरीस ते झाडावर चढले. मग त्या पिलांची आई काहीतरी ओरडली. सगळी पिले आईकडे धावली. मग ती पिले आईसारखी कृती करू लागली. आई धावली की, ती धावत. आई थांबली की, ती थांबत.

अशा त-हेने माकडे आपल्या टोळीतच शिकतात. तीच त्यांची शाळा आहे.

Similar questions