write about the information अवयव प्रत्यारोपण (Organ transplantation) in marathi
Answers
मानवी शरीरातील अवयव वाढते वयोमान अपघात, रोग, आजार, इत्यादी कारणामुळे एकता निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचे जीवन असम होते त्याच्या जीवास धोकाही निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेला अवयव मिळाला तर त्याचे जीवन सुसह्य होते, त्याचे प्राण वाचू शकतात.
अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदाता उपलब्ध होणे खूप गरजेचे असते. प्रत्येक व्यक्तीला किडनीची एक जोडी असते. एका किडनीच्या मदतीने शरीरात उत्सर्जनाचे काम चालू शकत असल्याने दुसरी किडनी दान करता येते. तसेच शरीराच्या काही भागावरील त्वचासुद्धा दान करता येते. अवयव प्रत्यारोपणावेळी दाता व गरजवंत यांचा रक्तगट, रोग, व्याधी, वय, इत्यादी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात.
इतर अवयव मात्र जिवंत असताना दान करता येत नाहीत. यकृत, हृदय, नेत्र यांसारख्या अवयवाचे दान मरणोत्तरच करता येते. यातूनच मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.