write about the information of लैंगिक आरोग्य (Reproductive health)in marathi
Answers
Answer:
विषयीच्या व्याख्येनुसार एक संपूर्ण शारीरिक,मानसिक आणि सामाजिक कल्याण म्हणजे सुस्थित आरोग्य होय यात फक्त रोगांपासूनचे संरक्षणच नाही तर अभाव अथवा दुर्बलता , ' प्रजनन स्वास्थ्य ' , अथवा ' लैंगिक आरोग्य / स्वच्छता ' , प्रजनन प्रक्रिया , कार्य आणि आयुष्याच्या सर्व स्तरास आणि वयोगटास समावेशक जीवन प्रणालीची काळजी घेणे म्हणजे आरोग्य .
प्रजनन स्वास्थ्य , याचा अर्थ हा आहे कि लोक एक जबाबदार , सुरक्षित आणि समाधानी कामजीवन जगू शकावेत आणि त्यांच्यापाशी प्रजोत्पादनाची क्षमता आणि जेव्हा आणि जेव्हढ्या वेळा तसे करण्याकरिता निर्णयाचे स्वातंत्र्य असावे.
यात स्त्री आणि पुरूषांकरिता माहितीचा तसेच सुरक्षित ,सहज उपलब्ध , प्रभावी त्यांना स्विकार्य परिवार नियोजन पद्धतीच्या निवडीचा अधिकारसुद्धा अभिप्रेत आहे.
सोबतच या अधिकारांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने बाळंतपण आणि बाळाचा जन्मस्त्रीयांना सुरक्षितपणे करून येईल अशी आरोग्य सेवा आणि माताप-पित्यास सुदृढ बालक प्राप्त करण्याची सर्वोत्कृष्ट संधी उपलब्ध व्हावी हेही अपेक्षीत आहे.
शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य म्हणतात. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच या आणि इतर कारणांमुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते.
स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर रहावे लागते. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव होत असतो. त्यामुळे गुप्तागांची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुरूषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्या टाळण्यासाठी गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
लैगिक आजारांमध्ये सायफिलीस आणि गोनो हीया हे दोन आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आढळतात हे दोन्ही आजार जीवाणूमुळे होतात. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चटे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस
गळणे, इत्यादी लक्षणे सायफिलीस या आजारामध्ये आढळून येतात, गोनो हीया या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनीमार्गातून पू स्त्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.