write about the information of mental stress
Answers
वाढत्या लोकसंख्येबरोबरच शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळण्यातील स्पर्धा प्रचंड वाढली आहे. विभक्त कुटुंबपद्धती, नोकरी/ व्यवसायासाठी घराबाहेर राहणारे आई-वडील अशा कारणांनी काही मुले लहानपणापासून एकाकी होतात व मानसिक ताणतणावांचा सामना करतात.
काही घरांमध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, पण मुलींवर अनेक बंधने घातली जातात. घरातली कामे करण्यातून मुलांना सूट, तर मुलींना 'सवय हवी' म्हणून कामे करावीच लागतात. एवढंच काय, ताजे/उरलेले अन्न, शाळेचे माध्यम याबाबतीतही एकाच घरातील भाऊ व बहिणीत भेदभाव केला जातो, तसा करू नका अशा अर्थाच्या उद्बोधक जाहिराती तुम्ही पाहता का ? समाजातही कुमारवयीन मुलींना चेष्टा-मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा विनाकारण दिलेल्या त्रासांचा सामना करावा लागतो. अशा स्त्री-पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावांची समस्या भेडसावते.
समाजातील वाढती अव्यवस्था, गन्हेगारी व हिंसा यामुळे हल्ली प्रत्येकालाच ताणतणाव सहन करावे लागत आहेत. त्याच वेळी 'जलद व सोपे उत्पन्नाचे साधन' अशा दृष्टिकोनातून याकडे पाहणारे या अपप्रवृत्तींना बळी पडतात व त्या व्यवस्थेचा भाग होऊ शकतात, सामाजिक अनारोग्याचा हा घातक परिणाम आहे,
I want only your points hehehehehe lol ❤
ata kdhi bolnar ka nay.... ≧ω≦