write about the information of संयुगाची रासायनिक सूत्रे - एक पुनरावलोकन in Marathi
Answers
आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रेणूचे दोन भाग असतात व ते म्हणजे कॅटायन व अॅनायन म्हणजेच आम्लारिधर्मी मूलक व आम्लधर्मी मूलक. हे दोन भाग विरुद्ध प्रभारित असतात.त्याच्यातील आकर्षण बल म्हणजेच आयनिक बंध होय. आयनिक संयुगाच्या नावात दोन शब्द असतात. पहिला शब्द कॅटायनाचे नाव असते तर, दसरा शब्द अॅनायनचे नाव असते. जसे सोडिअम क्लोराइड अशा संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिताना कॅटायनाची संज्ञा डाव्या बाजूला तर त्याला जोडूनच उजव्या बाजूला अॅनायनांची संज्ञा लिहितात. संयुक्त मूलकाची संख्या 2 किंवा जास्त असल्यास मूलकाची संज्ञा कंसात लिहून संख्या कंसाबाहेर उजवीकडे पायाशी लिहीतात.
रेणुसूत्र लिहिताना आयनांवरील प्रभार दाखवत नाहीत मात्र त्या त्या आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. संयुजांच्या तिरकस गुणाकार पद्धतीने ही संख्या मिळवणे सोपे जाते.